Ticker

6/recent/ticker-posts

सेवानिवृत्त कांतीलाल पराडके यांचा सपत्नीक सत्कार!संघर्षमय जीवनप्रवास!


चित्रा न्युज प्रतिनिधी
अक्कलकुवा : सहाय्यक वाहतूक निरीक्षक तथा सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल पराडके यांचा सेवानिवृत्त पर कार्यक्रम सोहळा अक्कलकुवा येथे उत्साहात पार पडला.कांतीलाल एस पराडके आणि व त्यांच्या पत्नी निर्मलाबाई कांतीलाल पराडके यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. सरकारी सेवानिवृत्तीनंतरचा उर्वरित गोड आयुष्य जनता जनार्दन, गोरगरीब वंचित घटकांसाठी समर्पित भावनेने समाजाभिमुख उपक्रम आधी परिवर्तनीय व शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक, अध्यात्मिक, धार्मिक कार्यात समाजातील एकमेकांना आनंद देणे, घेण्यासाठी व्यतीत होऊ द्या. अशा शुभेच्छा देण्यात आल्या.
                        कांतीलाल एस पराडके हे भावंडातील पाचवा क्रमांकाचे असून त्यांचे प्राथमिक शिक्षण इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतचे शासकीय आदिवासी आश्रम शाळा राणीपूर तालुका शहादा जिल्हा धुळे. १९७० त्यानंतर इयत्ता आठवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण , पंडीत जवाहरलाल नेहरु विद्यालय व ज्युनिअर कॉलेज बोराडी तालुका शिरपूर जिल्हा धुळे येथे,पण दुर्दैव असं की, श्री कांतीलाल पराडके हे इयत्ता दहावीत असताना १९८३ मध्ये वडिलांचे निधन झाल्यानंतर त्यांनी आपले पुढील शिक्षण चालूच ठेवून, इयत्ता अकरावी करिता एस.पी.डी.एम. कॉलेज शिरपूर येथे ऍडमिशन घेऊन पुढील शिक्षण चालू केले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही,त्यांनी टी.वाय. बी कॉम चे शिक्षण पूर्ण केलं व शेवटी परिस्थितीची जाणीव ठेवून माननीय  श्री, डॉक्टर अमृतसिंघ वसावे साहेब (धुळे जिल्हा शल्यचिकित्सक) यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी विद्यार्थी संघटना निर्माण करून त्या संघटनेचे सचिव पदी विराजमान झाले व  त्यावेळेस आदिवासी भागामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण म्हणजेच वन जमिनीवर आदिवासींचा हक्क या नेतृत्वाखाली त्यांनी आदिवासींसाठी जमिनी द्या. आदिवासींना वन हक्क अधिकाराखाली लढा देऊन, संघटनाचे पूर्ण नेतृत्व त्यांनी केले. शेवटी समाज व समाजातील संस्कृती व रूढी  परंपरा ,पद्धतीने पुढील आयुष्यासाठी १९९०व १९९१ मध्ये  महाराष्ट्र राज्य  मार्ग परिवहन  महामंडळ अक्कलकुवा तालुका अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार येथे इयत्ता दहावी वर कंडक्टरची नोकरी स्वीकारून पुढील आयुष्य चालू ठेवून, शिक्षणाच्या उपयोग करून,  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ  अक्कलकुवा येथे वाहक पदी १९८९-९० या वर्षी नियुक्ती व तेथून पुढे सलग त्याच पदावर कार्यरत असतांना २०१९ या वर्षी वाहतूक नियत्रंक म्हणून प्रोमोशन मिळाले व या पदावर काम करीत असतांना कॅशिअर चे काम देखील करत होते. तसेच DOR व LF 1 चे सुध्दा काम करीत होते त्याच बरोबर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कर्मचारी इंटक युनियन अक्कलकुवा आगार सचिव पदाचे काम देखील त्यांनी पार पाडले. 
                            २०२५ या वर्षी साह्याक वाहतूक निरिक्षक (ATI) या पदावर पदोन्नती होऊन त्यांची ३५ वर्ष सेवा पूर्ण होत असून आज दिनांक ३१मे २०२५ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या पुढील वाटचालीस आमच्या सर्व भावंडांकडून व सर्व पराडके परिवाराकडून "सेवापुर्ती सोहळा " म्हणजेच माझ्या नजरेतून जणू एक दिवा स्वप्नच पहा ना !! बोलता बोलता भराभर काळ पुढे सरकला अजूनही खरंच वाटत नाही, मला आठवतंय मागील ३०ते ३५ वर्षांपूर्वी अक्कलकुवा सारख्या ठिकाणी चारही बाजूंनी कोणतीच सुखदैव अशी कोणतीच व्यवस्था,स्थिती नसतानाही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही तत्कालीन काटकसरीची परिस्थितीतही त्यांनी आपला व आपल्या परिवारासह अगदी कमी पगारातील ती लटकती नोकरी व त्यातही कौटुंबिक अनेक जबाबदाऱ्या तसेच सप्त्यांपैकी प्रत्येकाचीच ती दोलायमान मनस्थिती, मानसिकता टिकून ठेवण्यासाठी अगदी शेवटपर्यंत आपल्या बरोबरीने ज्यांनी ज्यांनी शर्तीचे प्रयत्न केले त्यापैकीच एक ते कांतीलाल पराडके.आता कुटुंबाला घरात वेळ द्या , घरात सदैव सकारात्मकता, कृतीशीलता, संस्कृत , पारदर्शकता, स्पष्ट सुसंवाद असावा. बस आता नांदा सौख्यभरे!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या