Ticker

6/recent/ticker-posts

वृद्ध कलावंत मानधन योजना बोगस लाभार्थी लाभ घेत आहेत,खरे लाभार्थी या योजनेपासून वंचित,, चौकशी करावी,,सामाजिक कार्यकर्ता, विजय चौडेकर,

विजय चौडेकर नांदेड जिल्हा प्रतिनिधी चित्रा न्यूज 

नांदेड:-वृद्ध कलावंत मानधन योजना हि शासनाने 
सुरू केली, बरेच वर्षांपासून त्याचा लाभ वृद्ध कलावंत घेत आहेत, महत्वाचे म्हणजे 
ह्या योजने चा फायदा ज्यांचा कधी कले शी काही संबंधच नाही ते या योजनेचा फायदा उचलत आहेत, आणि जे कलावंत, नाटक कार,असो लेखक,कवि,लावणी सम्राज्ञी, भजनि मंडळ, वाजंत्री वादक, असे बरेच कलावंत, मानधन योजनेपासून वंचित आहेत, पंचायत समिती मार्फत वृद्ध कलावंत मानधन योजना साठी, कागदपत्रे फाईल तयार करून मागवली जाते, आणि ती फाईल जिल्हा परिषदे मध्ये मंजूरीस जाते, परंतू मेन मुद्दा गरजू वृद्ध कलावंत मानधन मंजूर होण्याची वाट पाहत असतात आणि त्यांची फाईल चार चार वर्षे तिथंच धुळखात पडते आणि दुसरी बाब चार चार वर्षे मिटिंगच होतं नाही, आणि जरी पाठ पुरावा करुन मंजूर झाली तर बर्याच फाईली त्रुटी मध्ये जातात आणि काही दोन चार मंजूर झाल्या त्यांना लवकर मानधन चालूं होतं नाही अशी परिस्थिती ह्या जिल्हा परिषदेमध्ये चालते आणि जरी काही त्रुटी निघाली असेल ते त्या वृद्ध कलावंताना कळविले जात नाही,ते वृद्ध कलावंत कार्यालयाच्या चकरा मारुन बेजार होत असतात, एक तर कलावंताना मानधन तुटपुंजे मिळते , आणि त्यामध्ये फाईली शेकडो, मंजुरी फक्त मोजकेच ते पण 
काही चिरीमिरी देऊन केलेलें,काही शिफारशी देऊन मंजूर केलेले सामाजिक कार्यकर्ता, विजय चौडेकर, पत्रकार, यांनी वेळोवेळी समाज कल्याण अधिकारी यांची भेट घेऊन, फोन वरती , विचारणा केली कलावंत मानधन योजना बद्दल हे फक्त गोल गोल फिरवत उडवाउडवीची उत्तरे देतात
आमची समिती च नेमली नाही, समिती नेमली जरी मिटींग च घेत नाही त मानधन मिळावे आपला उदरनिर्वाह चालवता यावा या आशेने हे वृद्ध कलावंत मेटाकुटीला येतो, परंतू हे मुजोर अधिकारी टस्स ना मस्स होता त आणि सरळ भाषेत सांगतात काही दिल्या शिवाय कामं कसं होणार,ती फाईल जाऊ द्या दुसरी फाईल तयार करून पाठवा, म्हणजे खरे लाभार्थी हे वंचित च राहाणार आणि बोगस लाभार्थी मलिदा खातं बसणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे,तरी वरिष्ठ अधिकारी, जिल्हा परिषद,C,O माॅडम, जिल्हा अधिकारी साहेब, समाज कल्याण अधिकारी, यांनी चौकशी करावी अशी मागणी वंचीत राहिलेले लाभार्थींन कडून होतं आहे,,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या