चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा - भारतीय संस्कृतीत हिंदू समाजात वटवृक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.निसर्गाचा समतोल राखण्यासाठी व पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्रत्येक स्त्रीने वटवृक्षाचे लागवड करून त्याचे संगोपन करण्याची नितांत आवश्यकता आहे.हिंदू समाजात वटपौर्णिमेला खूप महत्त्व आहे.हा सण जेष्ठ महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो.या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाची पूजा करतात आणि निर्जल व्रत ठेवतात.वटवृक्षाला ब्रह्म,विष्णू आणि महेश यांचे रूप मानले जाते. त्यांच्या फांद्या आणि पारंब्या सावित्रीचे रूप मानल्या जातात. वट वृक्षाचे सर्वात मोठे आयुष्य असणारा वृक्ष म्हणून ओळखला जातो.पूर्वीच्या काळातील स्त्रिया तीन दिवसाच व्रत करायच्या.मात्र आता पौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया उपवास करून पूजा करतात.वटपोर्णिमा म्हणजे सात जन्म तोच पती मिळण्यासाठी महिलांनी करावयाच व्रत! पूर्वी महिला अशा म्हणत असे की "जन्मोजन्मी मला हाच पती मिळू दे" अशी धारणा आपल्या समाजात मागच्या बराच काळापासून रूढ आहे. हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजे वटपोर्णिमा. यावर्षी 10 जून रोजी वटपौर्णिमा आहे या दिवशी वडाच्या वृक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सध्याच्या परिस्थितीचा विचार केला तर आपणास असे दिसून येते की, वृक्षतोड हे जास्त प्रमाणात होत आहे. विशिष्ट वेळेस पाणी यायला पाहिजे ते पाणी काही येत नाही.म्हणून निसर्गाचा समतोल राखणं हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.जर वृक्ष हे जास्त प्रमाणात असेल तर निसर्गाचा समतोल चांगल्या प्रमाणात राखला जाईल.आज पाणी वेळेवर यायला पाहिजे ते पाणी काही वेळेवर येत नाही.याचाच अर्थ असा की निसर्गाचा पूर्णतः समतोल बिघडलेला आहे. आणि हे समतोल राखायचा असेल तर प्रत्येक स्त्रियांनी "एक स्त्री एक झाड" या प्रमाणात वृक्षाची लागवड करून त्या वृक्षाचे संगोपन करणे काळाची गरज आहे.आणि हे जर शक्य झाले तर आपण वटपौर्णिमा साजरी केली आणि याचे सार्थक होईल असे मत ओबीसी क्रांती मोर्चाच्या महिलांनी व्यक्त केले आहे.
0 टिप्पण्या