एकाचा मृत्यू; ६ दिवसांनी गुन्हा दाखल!
चित्रा न्युज प्रतिनिधी
शहादा ;-शहादा तालुक्यातील मामा मोहिदे रस्त्यावर दिनांक ६ जून २०२५ ला सायंकाळी ७.३० च्या सुमारास दोन मोटारसायकलचा अपघात झाला,त्यापैकी मक्कनसिंग मोतीसिंग पवार यांचा दिनांक ११ जून २०२५ ला उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर शहादा पोलीस ठाण्यात संशयित आरोपी जितेंद्र सोमा कोळी राहणार मोहिदा याच्यावर भारतीय न्याय दंड संहिता २०२३ कलम १०६(१),२८१ व मोटार वाहन अधिनियम १९८८ नुसार कलम १८४,१३४,१८७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मधूकर मोतीसिंग पवार राहणार धांदे खुर्द तालुका शहादा यांच्या फिर्यादीनूसार ,माझा लहान भाऊ मक्कनसिंग हा आयटीआय प्रशिक्षण विद्यालय शहादा जिल्हा नंदुरबार येथे सुरक्षारक्षक म्हणून कामाला होता.एम एच ३९ अ एम ०९८६ या मोटार सायकल ने रोज ये जा करायचा. दिनांक ६ जून २०२५ रोजी नेहमीप्रमाणेच ड्यूटीवर गेला.ड्यूटीवरून सायंकाळी ७.३० वाजता परत येताना त्याचा मामाचे मोहिदे रस्त्यावर अपघात झाला आहे व तो जखमी अवस्थेत आहे,असे मला फोनवर समजले.त्यानंतर त्याला शहादा येथील उपजिल्हा रुग्णालयात व नंतर शहादा येथील खाजगी रूग्णालयात दाखल केले.परंतू त्याचा उपचार होत नसल्याकारणास्तव धुळे येथे त्याला हलविण्यात आले.तेथे उपचारादरम्यान त्याचा दिनांक ११ जून २०२५ रोजी मृत्यू झाला.सदर अपघात हा मोटार सायकल क्रमांक एम एच ३९ एएच ५२९५ वरील जितेंद्र कोळी राहणार मोहिदा यांनी केल्याचे समजले. म्हणून मी जितेंद्र कोळी यांच्याविरुद्ध कारवाई करावी ,म्हणून पोलीस ठाण्यात लेखी फिर्याद देत आहे.
घटना ६ जून २०२५ ला घडली असतांना शहादा पोलिसांनी आमची फिर्याद घेण्यास टाळाटाळ केली.आदिवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने अखेर ११ जून २०२५ रोजी अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.परंतू हा अपघात नसून जितेंद्र कोळी व त्याच्या साथीदारांनी माझ्या भावाला जखमी अवस्थेत असतांना लाथा बुक्यांनी मारहाण करीत असतांना रस्त्यावर येणा-या जाणा-या लोकांनी बघितले आहे. त्यापैकी काही साक्षीदारांनी तसे जबाब नोंदवले आहेत.म्हणून माझ्या भावाचा मृत्यू हा फक्त अपघाताने झाला नसून त्याला जखमी अवस्थेत बेदम मारहाण केल्यामुळे झाला आहे.हा अपघात नसून घात आहे.म्हणून संशयीत आरोपींची सखोल चौकशी करून आरोपीविरुद्ध फक्त अपघाताचा गुन्हा दाखल न करता खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा,अशी मागणी मयतचे नातेवाईक करीत आहेत. अपघात झालेले मोटारसायकल सुद्धा शहादा पोलिसांनी परस्पर कोणालाही न माहीत पडता संशयास्पद स्थितीत पोलीस ठाण्यात आणून ठेवले असून अपघात च्या दिवशीचे मोटार सायकल चे फोटो व आताचे मोटार सायकलची स्थिती यात जमीन आसमानचा फरक दिसत आहे. माणूस मेला तरी त्याच्या मोटार सायकलला काहीच झाले नाही,काहीच का फुटले नाही? असे सवाल करत शहादा पोलिसांनी आरोपीला वाचविण्यासाठी मोटारसायकलच्या अपघातात मक्कनसिंग याचा मृत्यू झाल्याचे दाखवण्यासाठी बनावट पणा करीत आहेत,असे सांगत मयतच्या नातेवाईकांनी शहादा पोलिसांच्या तपासावरच संशय निर्माण केला आहे.
0 टिप्पण्या