चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर :-अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयाचे सात विद्यार्थी NIPER-JEE या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत यशस्वी झाले आहेत. औषध निर्माण शास्त्र विषयात केंद्र शासन संचलित संकुलामध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्यासाठी ही परीक्षा महत्त्वाची मानली जाते.NIPER JEE ही परीक्षा दरवर्षी राष्ट्रीय स्तरावर NIPER मार्फत घेतली जाते. यामध्ये शैक्षणिक वर्ष २०२४ - २५ मधील बी.फार्मसी च्या अंतिम वर्षातील सात विद्यार्थी पात्र ठरले आहेत. त्यामध्ये कु. तैशिन शेख, कु.सोनल देवकर, कु.आकांक्षा निचळ, कु.वर्षा पिसे, कु. आकांक्षा माळी, कु. पायल एकतपुरे आणि कु .निकिता गवळी या विद्यार्थिनी पात्र ठरल्या आहेत. कु. तैशिन शेख ही NIPER द्वारे घेतल्या जाणाऱ्या M.S. आणि M. Tech. या दोन्ही अभ्यासक्रमासाठी पात्र ठरली आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिल भानवसे यांनी अभिनंदन केले. सदर परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना सर्व प्राध्यापकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज चे मार्गदर्शक संचालक मा. श्री. जयसिंह मोहिते पाटील, शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज चे अध्यक्ष मा.श्री संग्रामसिंह जयसिंह मोहिते पाटील, महाविद्यालय विकास समिती चे सभापती श्री. विनोदकुमार दोशी तसेच शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजचे सचिव श्री. अभिजीत रणवरे आणि सहसचिव श्री. हर्षवर्धन खराडे पाटील यांनी कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
0 टिप्पण्या