चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : पंतजली योग समिती व महिला पतंजली योग समिती भद्रावतीच्या वतिने 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रम श्री मुरलीधर पाटील गुंडावार लॉन भद्रावती येथे उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला उदघाटकं म्हणून भद्रावती वरोरा निर्वाचन क्षेत्राचे आमदार माननीय करणदादा देवतळे ह्यांना आज भरगच्च कार्यक्रम असताना सुद्धा त्यांनी ह्या कार्यक्रमाला हजेरी लावली हे विशेष ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान श्री आनंदरावजी कुटेमाटे ह्यांनी भूषविले तसेच ह्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष अनिल भाऊ धानोरकर,माजी उपाध्यक्ष प्रफुल चटकी, मा. धनराजजी आस्वले सामाजिक कार्यकर्ते, श्री बंडुजी आकनूरवार सहाय्यक गट विकास अधिकारी पं. स भद्रावती व योग शिक्षक उल्हासरावजी भास्करवार, हे उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने तसेच स्वागत गीत व सरस्वती वंदनाने झाली. पाहुण्याच्या स्वागतानंतर आयुष मंत्रालयाचा प्रोटोकॉलनुसार योगा घेण्यात आला मान्यवराची भाषणे आटोपल्यानंतर लहान मुलांनी योगावर योग नृत्य सादर केली मुलांनी आणि महिलांनी पिरॅमिडचे सादरीकरण केले काही मुलांनी कठीणात कठीण आसनाचे प्रात्यक्षिक करुण दाखविली, स्केटिंगच्या माध्यमातून योगा आसन यांची सुद्धा प्रात्यक्षिके करण्यात आली, लहान मुलांना गौरव पदके देऊन त्यांना गौरविण्यात आले असा भरगच्च योग दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्याचबरोबर ग्रामीण रुग्णालय भद्रावतीच्या वतिने रक्त तपासणीचे शिबिर घेण्यात आले. तसेच योग दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन पतंजली योग समिती व महिला पतंजली योग समिती भद्रावतीच्या माध्यमातून करण्यात आले. या रक्तदान शिबिरात 55 योगसाधकांनी रक्तदान केले असा भव्य दिव्य कार्यक्रम राबविण्यात आला. वंदेमातरमाने कार्यक्रमाची सांगता झाली. लगेच सर्वच उपस्थितांसाठी अल्पपोहाराची व्यवस्था करण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ. वृषाली विनोदराव पांढरे, प्रास्ताविक प्रकाश आस्वले, आभार प्रदर्शन सौ. सरिता सातपुते ह्यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व पतंजलीचे योग साधक, योग शिक्षक तसेच भद्रावतीतील इतर योग साधनेशी जुळून असलेले सर्व अध्यात्मिक संस्था व भद्रावती येथील नागरिक ह्यांनी हातभार लावला.
तसेच भद्रावती परिसरात जसे न्यायालय भद्रावती, संत निरंकारी आश्रम,भद्रावती,अंकुर विद्यालय आयुध निर्माणी चांदा भद्रावती,विवेकानंद माध्यमिक विद्यालय भद्रावती, पॉवर ग्रीड भद्रावती,सी एम पी डी आय कार्यालय, एकता नगर चारगाव, जगद्गुरू नरेंद्र महाराज संस्था भद्रावती, सामुदायिक भवन कुचना, सामुदायिक भवन नेहरू क्लब, माजरी, सामुदायिक भवन एकता नगर वसाहत, एकोना ओसीयम कार्यालय,एन एम यू जी to ओ सी माईन, केंद्रीय विद्यालय न्यू कुचना वसाहत, माजरी, क्षेत्रीय अस्पताल माजरी क्षेत्र, कर्मवीर विद्यालय माजरी ग्रामपंचायत, भारतीय ग्रामीण विद्यालय, कुचना ग्रामपंचायत,येथे पतंजली योग शिक्षकांनी आयुष मंत्रालयाच्या प्रोटोकालनुसार योग वर्ग घेऊन योग दिन उत्सहाने साजरा करण्यात आला.
0 टिप्पण्या