Ticker

6/recent/ticker-posts

नंदलाल पाटील कापगते विद्यालयात प्रवेशोत्सव दिन उत्साहात साजरा...


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा :- नंदलाल पाटील कापगते विद्यालय साकोली  येथे आज दिनांक 23 जून 2025 ला शैक्षणिक वर्ष 2025 - 26 प्रवेशित विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात शालेय बँड पथकाच्या गजरात  साजरा करण्यात आले.
          उन्हाळी सुट्ट्या  असल्याने शालेय प्रांगणात शुकशुकाट निर्माण झाला होता परंतु आज पासून शैक्षणिक सञाला सुरुवात झाल्याने पुन्हा एकदा शालेय परिसर गजबजलेला होता. एखाद्या सणाची तयारी करावी त्याप्रमाणे शिक्षकांनी शाळेच्या पहिल्या दिवसाची तयारी केली होती. शाळेच्या आवारात शिक्षिकांनी रांगोळी काढलेली होती. 
         नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी आयोजित  या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे, शिक्षक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
        कार्यक्रमाची सुरुवात नव्याने शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ, पुष्प  पाकळ्यांच्या वर्षावाने व टाळ्यांच्या गजरात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
         प्रवेशोत्सव दिन आयोजित कार्यक्रमात समग्र शिक्षा अभियान अंतर्गत वर्ग ५ ते ८  च्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके प्रमुख पाहुण्यांचे हस्ते वितरित करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांचे शालेय बँड पथकाच्या गजरात जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या उत्साहाबरोबरच शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची ओळख करून घेणे, त्यांना अभ्यासक्रमाची माहिती देणे असे नियोजन दिवसभरात चालले तसेच विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी गोड जेवन सुद्धा देण्यात आले. 
           यावेळी  प्रमुख पाहुणे म्हणून  शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ऋग्वेदजी येवले, डॉ. लेंडे, सौ. तनुजा  हत्तीमारे, सौ.सिमा देशमुख   इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
        हे सर्व नियोजन मुख्याध्यापिका आर. बि. कापगते, डि. एस. बोरकर, प्रा. स्वाती गहाणे, प्रा. के.जी. लोथे, राजेश कापगते, डि. डि. तुमसरे, एम.एम.कापगते, एस.व्ही. कामथे व इतर प्राध्यापक,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या