Ticker

6/recent/ticker-posts

26 जुलै कारगिल विजय दिन साजरा

चित्रा न्युज प्रतिनिधी 
नाशिक :-शहीद जाट भगतसिंह शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदगाव जिल्हा नाशिक येथे 26 जुलै कारगिल विजय दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात सन 1999 मध्ये झालेल्या कारगिल युद्धात शहीद झालेल्या 527 वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करुन करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सेवानिवृत्त मेजर बाजीराव मोहिते यांनी भुषविले.
याप्रसंगी विरपत्नी श्रीमती मनीषा मोहिते यांचा सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर सेवानिवृत्त मेजर नानासाहेब काकळीज, सेवानिवृत्त मेजर बाळासाहेब सोनस, मेजर जगधने, मेजर पवार, मेजर बागुल, मेजर बोरसे, श्री बच्छाव व संस्थेचे गटनिदेशक श्री निकम सर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सूत्रसंचालन श्री अरुण मढवई यांनी केले.
याप्रसंगी व्यासपीठावरून बोलताना नानासाहेब काकळीज यांनी वेगवेगळ्या युद्धातील काही निवडक प्रसंगाचे चित्रण हुबेहूब रसिकांच्या डोळ्यासमोर उभे केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेतील दिपक गावले,वनिता बर्वे, प्रगती साखरे,सुशील तायडे, गोविंद शिंदे,अलका सुरे, राहुल गायकवाड, निखिल जगताप, श्रीमती जाधव आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या