चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : ताडोबा परीसरातील ग्रामीण विध्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी पुण्यातील वन्यजीव छायाचित्रकार श्री शशीभाऊ काटे यांच्या मार्गदर्शनाखाली शशी काटे फाउंडेशनच्या पुढाकाराने व एम आय लाईफ स्टाईल ग्लोबल मार्केटिंगच्या सहकार्याने सरस्वती विद्यालय, मुधोली, चंद्रपूर येथे चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले गेले होते. शशी काटे फाउंडेशन च्या वतीने गेली ७ ते ८ वर्ष ताडोबा परीसरातील गावांमध्ये दिवाळी फराळ वाटप विद्यार्थांना शालेय साहित्य वाटप, ब्लॅंकेट वाटप महिलांसाठी साडी वाटप असे विविध सामाजिक उपक्रम आयोजित केले जात आहेत, त्याच अनुषंगाने यावेळी ताडोबा चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले गेले होते. यामध्ये मोहर्ली, जुनोना, भामडेळी, सितारामपेठ, मुधोली, कोंडेगाव, खुटवंडा, घोसरी, भद्रावती, तुकूम या गावांमधील ८०० विध्यार्थी सहभागी झाले होते. स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला फाउंडेशन च्या वतीने चित्रकलेचे साहित्य, रायटिंग पॅड, छत्री, खाऊ आणि एम आय लाईफ स्टाईल ग्लोबल मार्केटिंगच्या वतीने T शर्टचे वाटप केले गेले. त्याचबरोबर स्पर्धेतील ९ विजेत्या स्पर्धेकांना फाउंडेशनच्या वतीने सायकल बक्षीस म्हणुन भेट दिली गेली. शशी काटे फाउंडेशनचे अध्यक्ष श्री शशीभाऊ काटे, ताडोबा परीसरातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री गजानन बापट त्याचबरोबर एम आय लाईफ स्टाईल ग्लोबल मार्केटिंगचे प्रमुख पदाधिकारी श्री संतोष भसे,प्रविण काळे, आप्पा राक्षे, हेमंत कोरडे, योगेश भसे आणि पुणे येथील युवा उद्योजक श्री दिनेश काटे, अजिंक्य भिसे यांनी तर सरस्वती विद्यालय मधली कडून मुख्याध्यापक श्री नरेश श्रीराम संस्थेचे अध्यक्ष श्री माननीय श्रावणबाबू नन्नावरे, श्री विलास खोड, श्री नजीर शेख श्री गेडाम सर व कु. रामटेके मॅडम , जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मधली कडून श्री कैलास उरकुडे मुख्याध्यापक यांनी स्पर्धेचे यशस्वी संयोजन केले. या उपक्रमामध्ये ताडोबा अभयरण्यातील गाईड ड्राइवर देखील उस्फुर्तपणे सहभागी झाले होते.
0 टिप्पण्या