सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं. 7058137098/9615179615
जामखेड - दुकानामध्ये सामान घेण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीला गोडाऊन मध्ये नेऊन मित्राच्या मदतीने मुलीचे हात व तोंड दाबुन तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलासह दोन जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कर्जत जामखेड चे आ. रोहीत पवार यांनी या घटनेबाबत सोशल मिडिया च्या माध्यमातून तीव्र संताप व्यक्त केला असुन आरोपीला अटक न झाल्यास प्रशासनाला परवडणार नाही असे देखील म्हंटले आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की जामखेड तालुक्यातील एका गावात रविवार दि २९ जुन रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अल्पवयीन मुलगी व तीची आई दुकानात आसताना त्या ठिकाणी एका अल्पवयीन आरोपी मित्र सह एका तरूणाचे वय २५ आहे असे दोघेजण दुकानात आले. अल्पवयीन मुलगा हा अल्पवयीन फीर्यादी मुलगी हीच्या वर्गातीलच आहे. यानंतर सामान देण्यासाठी फीर्यादी अल्पवयीन मुलगी व आरोपी हे त्यांच्या घराजवळील गोडाऊन मध्ये आले. यावेळी अल्पवयीन मुलाने फीर्यादी मुलीचे तोंड दाबले व दोन्ही हात पकडले तर दुसरा आरोपी ने पिडीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला व घटनास्थळाहुन आरोपी पळुन गेले. यानंतर सदरचा घडलेला प्रकार पिडीत अल्पवयीन मुलीने आपल्या आईला सांगितला व त्यानंतर पिडीत मुलीच्या आईवडिलांनी जामखेड पोलीस स्टेशनला धाव घेतली.
याप्रकरणी पिडीत अल्पवयीन मुलीने जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून एका तरूण वय २५ व त्याचा मित्र एक अल्पवयीन असे दोघांनवर जामखेड पोलीस स्टेशनला पोक्सो व अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मधिल अल्पवयीन मुलास अहिल्यानगर येथील बालसुधारगृहात पाठवण्यात आले असुन दुसरा आरोपी हा अद्याप फरार आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा जाधव या करीत आहेत.एक आरोपी पोलिसांनी लवकर अटक केले नाही तर गाव बंदचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
0 टिप्पण्या