Ticker

6/recent/ticker-posts

महसूल व वन विभाग तहसील कार्यालय जामखेड व ग्रामीण विकास केंद्र संस्थेच्या वतीने विविध योजनांचा व नागरिकत्वाच्या पुराव्याचे वाटप...

 
सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं. 7058137098/9615179615

जामखेड :- महसूल व वन विभाग तहसील कार्यालय जामखेड व ग्रामीण विकास केंद्र यांचे संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान जगदंबा लॉन्स खर्डा रोड जामखेड या ठिकाणी घेण्यात आले शिबिर कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस व भारतीय संविधान प्रास्ताविकेला मान्यवरांच्या हस्ते पुष्प अर्पण करून सुरुवात करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे विनोद लोंढे साहेब सहाय्यक आयुक्त इतर मागास अहिल्यानगर नितीन पाटील साहेब उपविभागीय अधिकारी कर्जत गणेश माळी साहेब तहसीलदार जामखेड व ॲड.डॉ.अरुण आबा जाधव संस्थापक अध्यक्ष ग्रामीण विकास केंद्र जामखेड उपस्थित होते या मान्यवरांचे महसूल व वनविभाग तहसील कार्यालय जामखेड व ग्रामीण विकास केंद्र यांच्या वतीने स्वागत करून सन्मान करण्यात आला.. छत्रपती शिवाजी महाराज व महाराजस्व समाधान शिबिरामध्ये विविध विभागाचे एकूण 18 सेवांचे लाभाचे वितरण करण्यात आले सदर शिबिरास अंदाजे 800 महिला व पुरुष उपस्थित होते या शिबिरास जामखेड तालुक्यातील भटके विमुक्त समाजातील  जाती-जमातींना जास्तीत जास्त लाभ वितरण करण्यात आले आहे.
      विविध योजना लाभार्थीची आकडेवारी
 जात प्रमाणपत्र 186,भटके विमुक्त समाजातील भटकंती करणाऱ्या कलाकार नागरिकांना ओळखपत्र 200,मतदान ओळखपत्र 20, शिधा पत्रिका 100,विशेष सहाय्यक विभाग यांचे निराधार व्यक्तींना लाभ वितरण 49, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील वारसांना लाभ वितरण 3, नैसर्गिक आपत्तीमुळे पशुधनाची नुकसान अनुदान वितरण 4,जिवंत 7/12 अंतर्गत वारस फेरफार व गाव नमुना 7/12  वाटप 59,गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात विमा योजना वारसांना लाभ कृषी विभाग 8, डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना लाभ वितरण पंचायत समिती 16,जिल्हास्तरीय विशेष घटक योजना पंचायत समिती जामखेड 4,दूध काढणी यंत्र वाटप मंजुरी वितरण पंचायत समिती जामखेड 6,मुक्त संचार गोठा लाभ वितरण 4,नगरपरिषद घरकुल लाभ वितरण प्रधानमंत्री आवास योजना शहरी 46, बेबी  केयर किट वाटप लाभार्थी व लेक लाडकी योजना लाभार्थी एकात्मता महिला बालविकास विभाग 8,दिव्यांग युनिक आयडी वाटप 3 ग्रामपंचायत खर्डा यांच्यावतीने मालमत्ता पत्रक वाटप 9 रो.ह.यो.अंतर्गत जॉब कार्ड 25  इत्यादी शासनाच्या विविध विभागाच्या योजनांचे लाभ वितरण एका छताखाली या शिबिराच्या निमित्ताने लाभधारकांना मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले आहे
       यावेळी नितीन पाटील साहेब उपविभागीय अधिकारी कर्जत म्हणाले की जातीच्या दाखल्यावाचून कोणीही वंचित राहणार नाही महाराष्ट्र शासनाचा लाभ खरंतर लाभार्थ्यांनी घेतला पाहिजे आजचे शिबिर लाभार्थ्यांच्या हिताचे आहे जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या योजनाचा लाभ घ्यावा असे पाटील साहेब म्हणाले व विनोद लोंढे साहेब सहाय्यक आयुक्त इतर मागास अहिल्यानगर यांनी आपले मनोगत व्यक्त केले व ॲड.डॉ.अरुण आबा जाधव म्हणाले की भटके विमुक्त समूहाला महाराष्ट्र शासनाची प्रत्येक योजना त्यांच्या पाला पर्यंत पोहोचवणार व या योजनेपासून कुणीच वंचित राहणार नाही ग्रामीण विकास केंद्र संस्थेच्या वतीने या गोरगरीब जनतेला योजनेचा लाभ मिळवून दिला देणार आहे व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश माळी तहसीलदार जामखेड यांनी केले
यावेळी तहसील कार्यालय जामखेड पूर्ण कर्मचारी व पदाधिकारी गट विकास अधिकारी मुख्याधिकारी तालुका कृषी अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी महिला व बालविकास अधिकारी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था उपअधीक्षक भूमी अभिलेख उपस्थित होते व ग्रामीण विकास केंद्र संस्थेचे संचालक बापू ओहोळ विशाल पवार संतोष चव्हाण सचिन भिंगारदिवे ऋषिकेश गायकवाड राजू शिंदे रजनी बागवान उर्मिला कवडे मनीषा शिंगाने ललिता पवार सर्व ग्रामीण विकास केंद्र संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या