Ticker

6/recent/ticker-posts

बिरसा फायटर्स ५६ पैकी २३ जिल्हा परिषदच्या जागा स्वबळावर लढणार!

लोकसभा,विधानसभा निवडणुकीनंतर जिल्हा परिषद लढण्याची बिरसा फायटर्सची तयारी

चित्रा न्युज प्रतिनिधी 
नंदूरबार : लोकसभा व विधानसभा निवडणूक स्वबळावर लढल्यानंतर आगामी जिल्हा परिषद नंदूरबार निवडणूक २०२५ बिरसा फायटर्स स्वबळावर लढणार आहे.नंदूरबार जिल्हा परिषदेच्या ५६ पैकी २३ जागांवर लढण्याची बिरसा फायटर्स कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे. तालुकानिहाय जिल्हा परिषद गटाची यादी बिरसा फायटर्सचे नंदूरबार जिल्हा प्रसिद्धीप्रमुख जालिंदर पावरा यांनी सोशल मिडीयावर प्रसिद्ध केली आहे.अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुटा,भांग्रापाणी,वेली,होराफळी अशे एकूण ४ गट व धडगांव तालुक्यातील रोषमाळ खुर्द,तोरणमाळ,राजबर्डी,कात्री,असली,मांडवी बुद्रुक,घाटली अशे एकुण ७ गट तसेच तळोदा तालुक्यातील बोरद,प्रतापपूर,अमोनी अशे ३ गट व शहादा तालुक्यातील कन्साई, म्हसावद  मंदाणे,चांदसैली,पाडळदे बुद्रुक,प्रकाशा,सारंगखेडा अशे एकूण ७ गट व नंदुरबार तालुक्यातील धानोरा हा एकमेव गट व नवापूर तालुक्यातील खांडबारा हा एक गट ,अशे एकूण ५६ पैकी २३ जिल्हा परिषद गटांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. या २३ गटसोडून उर्वरित २३ गटातून बिरसा फायटर्स तर्फे लढण्यास इच्छुक उमेदवार असल्यास संघटनेस कळवावे.असे ही आवाहन करण्यात आले आहे.
              जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अक्कलकुवा तालुका प्रमुख म्हणून सुनिल तडवी,धडगांव तालुका प्रमुख सुशिलकुमार पावरा, तळोदा तालुका प्रमुख हिरामण खर्डे,शहादा तालुका प्रमुख गोपाल भंडारी,नंदुरबार तालुकाप्रमुख किसन वळवी व नवापूर तालुका प्रमुख राकेश गावीत यांची नेमणूक करण्यात आली आहे. नंदूरबार लोकसभा मतदारसंघातून बिरसा फायटर्स संघटनेकडून अपक्ष उमेदवार म्हणून सुशिलकुमार पावरा यांनी निवडणूक लढवली होती.त्यांना ९ हजार मते मिळाली होती.शहादा विधानसभा मतदारसंघातून गोपाल भंडारी,अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून सुशिलकुमार पावरा व सटाणा विधानसभा मतदारसंघातून संजय दळवी अशा ३ बिरसा फायटर्स उमेदवारांनी विधानसभा निवडणुक लढवली होती.बिरसा फायटर्स उमेदवारांनी समाधानकारक मते मिळवून अनेक राजकीय पक्षाच्या उमेदवारांना धक्का देत राजकीय पक्षांची गणिते बिघडवली होती.या निवडणूकीत आम्ही आदिवासी संघटनांशी युती करू शकतो,परंतू राजकीय पक्षांशी युती करणार नाहीत,स्वबळावर व स्वखर्चावर ही निवडणूक जिंकण्यासाठीच लढविणार आहोत ,अशी प्रतिक्रिया बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या