Ticker

6/recent/ticker-posts

शिवसेना तालुका चिमूरची संघटनात्मक बैठक संपन्न.भाजप व उबाठा शिवसेना कार्यकर्त्यांनी शिंदे शिवसेनेत घेतला प्रवेश.


चित्रा न्युज प्रतिनिधी 
  
भद्रावती :  शिवसेना( शिंदे गट)  तालुका चिमूर ची संघटनात्मक बैठक जिल्हा प्रमुख नितीन मत्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत जिप विश्रामगृहात दिनांक २५ जुलै ला झाली असता या बैठकीत भाजप, उबाठा शिवसेनाच्या अनेक पदाधिकारी यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला.
     या बैठकीत जिल्हा प्रमुख नितीन मत्ते व युवा सेना जिल्हा प्रमुख आलेख भाऊ रट्टे यांनी गाव तिथं शाखा उघडून शाखा प्रमुख, शिवदूत, बूथ प्रमुख पदी शिवसैनिकांना नेमणूक करण्याचे मार्गदर्शन केले.
     या बैठकीत भाजप जेष्ठ कार्यकर्ते डॉ वसंत झोडे, राहुल शंभरकर, सुनील दूधनकर रामदास श्रीरामे तसेच उबाठा शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सचिन शेटे, तानाजी सहारे बोथली,उप शहर प्रमुख नंदू कामडी, कांग्रेस चे झामदेव आत्राम जांभूळघाट यांनी  शिवसेना पक्ष प्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या कार्या वर प्रेरित होऊन जिल्हा प्रमुख नितीन मत्ते, युवासेना जिल्हाप्रमुख आलेख भाऊ रट्टे व तालुका प्रमुख विलास डांगे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
     यावेळी शिवसैनिक सुरज भाऊ शाहा, शिवसैनिक सुमित हस्तक, वैभव डांगे, सुनील धोटे, जयेंद्र सवाईमुन सह आदी शिवसैनिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या