Ticker

6/recent/ticker-posts

पोंगेझरा फार्मर प्रोडूसर कंपनी ला जिल्हा किसान संघाच्या पदाधिकारीनी भेट दिली

चित्रा न्युज प्रतिनिधी 
गोरेगांव:- 01/06/ 2025 रोज मंगलवारला पोंगेझरा फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड गोरेगांव याठिकाणी गोंदिया जिल्हा किसान संघाच्या पदाधिकारींनी भेट देऊन कंपनीची पाहणी केली.
त्यावेळी पोंगेझरा फार्मर प्रोडूसर कंपनी संचालक मा.श्री.सुरेंद्र(बबलु)बिसेन यांनी माहिती देतांनी सांगितले की, पोंगेझरा फार्मर प्रोडूसर कंपनीची स्थापना करुन विदर्भामध्ये तेलबियांवर प्रकिया करुन शुद्ध तेल व आरगॉनीक तांदळाची ग्रेडींग व पेकींग करुन शेतकऱ्यांचा आर्थीक  उत्पन्न वाढावा व दैनंदिन  जिवनात तेल आणी तांदुळ  हे महत्वाचें  घटक असुन ग्राहक वापरत असुन आरोग्याचा जो खेळ चाललेला आहे  तो थांबवावा हा त्यामागचा खरा उदेश्य.
 भारतीय किसान संघ गोंदिया जिल्हा तर्फे 
मा. डॉ. मंगल बिसेन  अध्यक्ष गोंदिया जिल्हा, मा. नुतन येडे प्रांतमंत्री, मा. मुन्नालालजी बघेले उपाध्यक्ष गोंदिया जिल्हा, मा. पुणेश बोपचे अध्यक्ष गोरेगांव, मा.कांतिलाल कटरे नगर अध्यक्ष गोरेगांव, मा. चंद्रकांत पारधी मंत्री गोरेगांव तालुका,तसेच भारतीय किसान संघाच्या इतर प्रतिनिधी मंडळ यांनी भेट दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या