⭕ चौकशी नंतर तीन वर्षानंतर डॉ. तारकेश्वर उईके यांच्यावर गुन्हा दाखल..
⭕ आरोग्य विभागात माजली खळबळ. पोलीस आणि आरोग्य विभागानेही गुप्तता का पाडली??
गडचिरोली: (चक्रधर मेश्राम) :- जगातील सर्व सामान्य व्यक्ती परमेश्वरा नंतर उपचार करणारा डॉक्टर असेल यात मुळीच शंका केली जात नाही. पण गडचिरोली शहरातील महिला व बाल रुग्णालयात दोन वर्षाच्या लहान मुलाच्या उपचारात हेतुपुरस्सर दुर्लक्ष केलेल्या डॉक्टर ला विभागीय चौकशी अंती दोषी ठरवण्यात आले असून तब्बल तीन वर्षानंतर गुन्हा दाखल झाल्यामुळे आरोग्य विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
या बाबत माहिती घेतली असता दिनांक 13 जुलै 2022 रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील सावली येथील प्रधाने कुटुंबातील पार्थ प्रधाने नावाच्या दोन वर्षाच्या मुलाला गडचिरोली शहरातील महिला व बाल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.पार्थ ला दाखल करते वेळी रात्र पाळीला डॉ. तारकेश्वर उईके यांची नाईट ड्यूटी होती,परंतु पार्थ चे प्राथमिक उपचार सुरू झाल्यानंतर अचानक पार्थची प्रकृती गंभीर झाल्याचे दिसून येताच रुग्णालयातील कार्यरत नर्स / ब्रदर्स ने डॉ. उईके यांच्या मोबाईल वर सतत संपर्क केला असता डॉ.उईके यांनी आपली झोप पूर्ण करण्यासाठी आपले मोबाईल बंद करून आपल्या घरी निघून गेल्याचे माहित झाले होते.जवळ पास तीन चार तास संपर्क डॉ. उईके यांच्याशी संपर्क न झाल्याने निष्पाप पार्थला कोणताही उपचार न मिळाल्याने अखेर पहाटेच्या सुमारास त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला होता.
या घटनेची माहिती मिळताच काही राजकीय लोकांचे दडपण आल्यानंतर त्यावेळचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रुडे यांनी लगेच चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती गठित करून डॉ. उईके यांची ताबडतोब बदली केली होती.त्या घटनेची तीन वर्षात झालेल्या चौकशीत पार्थच्या उपचारात निष्काळजी झाल्याचे दिसून आले होते.चौकशी समितीने आपला अहवाल तयार करून वरिष्ठांना सादर केल्यानंतर उप संचालक आरोग्य विभाग नागपूर यांनी 18 जुलै 2025 रोजी आपल्या अहवालात, 13 जुलै 2022 रोजी पार्थ प्रधाने याचा मृत्यू डॉ.तारकेश्वर उईके यांनी मुद्दाम निष्काळजी केल्यामुळे झालेला असल्याचे नमूद केले आहे.
या अहवालाची प्रत प्रधाने कुटुंबाला मिळताच पार्थ चे काका चंदू प्रधाने यांनी दिनांक 24/7/2025 रोजी गडचिरोली ठाण्यात तक्रार दाखल केली असून डॉ.तारकेश्वर उईके यांच्यावर, पार्थ च्या उपचारात मुद्दाम दुर्लक्ष केल्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे आरोप निष्पन्न झाल्याने भारतीय न्याय संहिता कलम 304 A अंतर्गत डॉ. उईके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी आरोग्य विभाग व पोलिस विभागाने कमालीची गुप्तता पाळली असल्याने या विषयावर गडचिरोली शहरात उलटसुलट चर्चा केली जात आहे. या दोन्ही विभागांनी प्रसिद्धी माध्यमांना माहिती का दिली नाही. असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
डॉ.तारकेश्वर उईके यांच्यावर कारवाई करण्यात आल्यानंतर पोलिस विभाग तसेच जिल्ह्यातील आरोग्य विभागाने कमालीची गुप्तता ठेवल्यामुळे आता आरोग्य विभागाच्या कार्यप्रणालीवर लोकांकडून शंका निर्माण केली जात असल्याचे दिसून आले होते. भारतीय दंड संहिता (IPC) मधील कलम ३०४-अ, निष्काळजी पणामुळे (negligence) मृत्यू झाल्याच्या संबंधित असुन जबाबदार व्यक्तींच्या निष्काळजीपणामुळे किंवा बेपर्वाईमुळे (carelessness) दुसऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर त्याला या कलमाखाली शिक्षा होऊ शकते. यामध्ये दोन वर्षांपर्यंतची शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. डॉक्टरने योग्य ती काळजी घेतली नाही, त्यामुळे मृत्यू झाला.
आवश्यक ती खबरदारी घेतली नाही.
जर डॉक्टरांनी उपचारांमध्ये निष्काळजीपणा केला आणि त्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाला, तर डॉक्टरांवरही या कलमाखाली कारवाई होऊ शकते. जर एखाद्याने हेतुपुरस्सर (intentionally) खून केला, तर कलम ३०२ (IPC Section 302) अंतर्गत कारवाई होते. हेतुपुरस्सर नाही, पण मृत्यू घडवण्याचा उद्देश होता, तर कलम ३०४ (IPC Section 304) अंतर्गत कारवाई होते.
कलम ३०४-अ हे निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्यास लागू होते. या बाबतीत पोलीस विभाग आणि आरोग्य विभाग काय कारवाई करते याकडे गडचिरोली शहरवासीयांचे लक्ष वेधले आहे. सदर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची चर्चाही शहर सुरू आहे.
0 टिप्पण्या