Ticker

6/recent/ticker-posts

शिवसेनेची वनविभागाला तातडीची मागणी – बिबट्या जेरबंद करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू!


चित्रा न्युज प्रतिनिधी 

भद्रावती : ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा परिसर व केंद्रीय विद्यालय शाळा भागात सध्या बिबट्यासह मोकाट जंगली प्राण्यांचा वाढता वावर भयानक स्वरूप धारण करत आहे. विशेषतः शाळेच्या आवारात बिबट्या दिसल्याने विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीरपणे उभा राहिला आहे.

या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले असून, याला दुजोरा देत शिवसेना भद्रावतीच्या वतीने वनविभाग भद्रावती कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले. हे निवेदन शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन भाऊ मत्ते यांच्या मार्गदर्शनात व शिवसैनिक सुरज भाऊ शाहा यांच्या नेतृत्वात देण्यात आले.

निवेदनात प्रशासनाकडे खालील मागण्या करण्यात आल्या:

सदर बिबट्याला तातडीने जेरबंद करावे.

परिसरात नियमित पेट्रोलिंगसाठी विशेष पथक तैनात करावे.
नागरिक व शाळांना सुरक्षिततेबाबत योग्य सूचना व मार्गदर्शन द्यावे.

शिवसेनेच्या शिष्टमंडळाने वनविभाग अधिकाऱ्यांना स्पष्ट इशारा दिला की,

> "विद्यार्थ्यांचे प्राण धोक्यात असताना प्रशासनाची उदासीनता दुर्लक्षित केली जाणार नाही. जर त्वरित पावले उचलली नाहीत, तर शिवसेना रस्त्यावर उतरेल व तीव्र आंदोलन करण्यात येईल."

शिवसेना नेहमीच जनतेच्या सुरक्षेसाठी सज्ज आहे आणि कुठल्याही प्रशासनाच्या हलगर्जीपणावर गप्प बसणार नाही, असेही यावेळी सांगण्यात आले.

या प्रसंगी जिल्हा प्रसिध्दी प्रमुख आशिष ठेंगणे, युवा शिवसैनिक सुमित हस्तक, उपशहरप्रमुख आकाश वानखडे, उपशहरप्रमुख मनीष बुच्चे, उपतालुका प्रमुख सुंदरसिंह बावरे,उपतालुकाप्रमुख सिंगलदीप पेंदाम व अनेक शिवसैनिक, पदाधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या