Ticker

6/recent/ticker-posts

गोसेखुर्द धरणाचे २७ दरवाजे उघडले!


आपत्ती व्यवस्थापणअधिकारी अभिषेक नामदास यांचे सतर्कतेचा इशारा !

✍️ भवन लिल्हारे उपसंपादक महाराष्ट्र राज्य मो.नं. 9373472847

भंडारा :  भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणातील पाण्याची पातळी नियंत्रित करण्याचे उद्देशाने शनिवारी धरणाची २७ वक्रद्वारे उघडण्यात आली आहे. याद्वारे ३.०४४.३३ क्युमेक पाण्याच्या विसर्ग करण्यात येत आहे. या पाण्याचा प्रवाहात धरणाच्या दोन्ही जलविद्युत प्रकल्पांमधुन सोडण्यात येणारा पाणी देखील समाविष्ट आहे. धरणातील वाढलेला पाणीसाठा आणी धापेवाडा घरणातून होणारा पाणीसाठा पाहता काही तासांत गोसेखुर्द प्रकल्पातून सोडण्यात येणारे पाणी ४.५०० क्युमेक पर्यंत जाईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. ते १०० किमी पर्यंत पोहचू शकते यामुळे नदीकाठच्या परिसरातील नागरिकांना मच्छीमारांना आणि शेतकऱ्यांना अतिरिक्त काळजी घेण्याचे आणि गरज नसल्यास नदीच्या परिसरात जाऊ नये असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास यांनी केले आहे.

आपत्ती व्यवस्थापन विभागाने ६.८ आणि ९ जुलै रोजी पिवळा इसारा आणि ७ जुलै २०२५ रोजी नारंगी इशारा जारी केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या