Ticker

6/recent/ticker-posts

भद्रावती खंड औद्योगिक बहुउदयशीय ग्रामीण सहकारी मर्यादित संस्था वार्षिक सर्व साधारण आमसभा सपन्न


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती : येथील नुकतेच भद्रावती खंड औद्योगिक बहुउदयशीय ग्रामीण सहकारी मर्यादित संस्था र नं  - 374
या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण आमसभा 2024 - 2025 संस्थेचे कार्यालय भद्रावती येथे दुपारी 1 = 00 वाजता पार पडली. 

या सभेचे अध्यक्ष कवडू पावडे संस्थेचे अध्यक्ष हे होते 
तर उदघाट्न म्हणून राजू गैनवार माजी नगरसेवक व संस्थेचे संचालक यांनी केले 
तर प्रमुख पाहुणे म्हणून  कवडू पावडे संस्थेचे अध्यक्ष - राजू गैनवार माजी नगरसेवक व संस्थेचे संचालक -किशोर बावणे, संस्थेचे उपाध्यक्ष - प्रवीण पावडे, संस्थेचे सचिव- गजानन जोगी, संस्थेचे संचालक- प्रकाश पिंपळकर, संस्थेचे संचालक - वंदना गैनवार संस्थेचे संचालिका -- सुशीला आवारी संस्थेचे संचालिका- मनीषा तराळे संस्थेचे संचालिका - आन्याजी लांबट संस्थेचे संचालक इत्यादी गनमान्य व्यक्ती मंचावर उपस्थित होते. 
सर्व पाहुण्याचे पुष्पमांलेने स्वागत करण्यात आले. 
प्रास्ताविक व संस्थेचे अहवाल वाचन  संस्थेचे सचिव प्रवीण पावडे यांनी केले. 
सभेचे विषय - मागील आमसभेचे सभा वृत्तांत वाचून मंजूर करणे -- नियम 34 प्रमाणे सन 2025 -- 2026 सालाकरिता बाहेरील कर्ज घेण्याची मर्यादा ठरविणे -- लेखा परीक्षकांचे नेमणूकीस मान्यता देणे -- संस्थेचे 2024 -- 2025 ची आर्थिक वर्षाचे विवरण पत्रके ( जमा खर्च - नफा - तोटा - ताळेबंदी ) वाचून कायम करणे व नफा विनियास मंजुरी देणे असे इत्यादी अनेक विषय होते. 
सभेचे अध्यक्षीय भाषण करतांना संस्थेचे कवडू पावडे म्हणाले की शेती आणि अनुषंगिक क्षेत्रावर देशातील 60 टक्के लोकसंख्या उपजीविकेसाठी अवलंबुन आहे राष्ट्रीय सहकार धोरण आखण्यात येईल असे सरकारने सांगितले गेले खरे तर घटनेप्रमाणे सहकार हा त्या त्या राज्य सरकारच्या 
अखत्यारीतीतील विषय आहे. सहकार क्षेत्र अधीकाअधिक प्रमाणात केंद्र सरकारच्या नियंत्रणात आणणे हे संघराज्याच्या स्पिरिटला शेद देणारे आहे ऐवढे करून देखील क्षेत्रासाठी फार तरतुदी देखील केलेल्या नाहीत असे ते म्हणाले 
उदघाटनीय भाषण करतांना संस्थेचे संचालक व माजी नगरसेवक राजू 
गैनवार म्हणाले की 1972 मध्ये संस्थेची स्थापना केलेली आहे तेव्हा पासून आज पर्यंत ऍडिट होत आहे शासनाच्या विविध योजना आम्ही राबवित आहोत अनेक बुलतेदार कारागीरानां व मजुरांना कर्ज मंजूर   शासकीय बँके मार्फत करून दिले आहेत अनेक बेरोजगारांना संस्थे मार्फत कर्ज उचलून रोजगार दिलेला आहे व विश्वकर्मा योजने अंतर्गत शासना तर्फे कार्यशाळा व स्वयं रोजगार शिबीर लावून त्यांना आर्थिक मदत करण्याचे काम संस्थे मार्फत होत आहे असे ते म्हणाले. 

कार्यक्रमाचे संचालन प्रशांत बरडे यांनी केले व आभार प्रदर्शन रवींद्र शेंडे यांनी मानले 
या सभे करिता दिलीप ठेंगे - विलास दाते - दिलीप मांढरे - गणेश वाणी इत्यादी अनेक संस्थेचे सभासद मोठया संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या