Ticker

6/recent/ticker-posts

हिमायतनगर तालुक्यातील नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट 1 लाखाची मदत जाहीर करा :-महाविकास आघाडीची मागणी..

लिंगोजी कदम जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण नांदेड

नांदेड :-हिमायतनगर तालुक्यात मागील आठ दिवसांपासून सतत झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील विशेषता नदी काठावरील शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान होऊन अनेक ठिकाणी पशुहानी व मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली आहे त्यामुळे हिमायतनगर तालुक्यासह शहरातील जनजीवन विस्कळीत झाल्यामुळे या सरकारने तालुक्यातील नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना हेक्‍टरी एक लाख रुपयाची तात्काळ मदत जाहीर करून तालुक्यातील महापुरामुळे पीक व जमीन पूर्णतः बाधित झाले असून त्या नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ सर्वे करून त्यांचे पंचनामे करा व घरांच्या पडझडीचा सर्वे करून त्यांना तात्काळ मदत जाहीर करा अशी असंख्य मागण्यासाठी हिमायतनगर येथील महाविकास आघाडी कडून आज दि 20 ऑगस्ट रोजी हिमायतनगर तहसीलदार यांना  लेखी निवेदन देऊन मागणी केली आहे यावेळी हिमायतनगर तालुक्यातील महाविकास आघाडीचे असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या