Ticker

6/recent/ticker-posts

टिळक विद्यालयाचा 66 वा वर्धापन दिन साजरा....

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा :- टिळक विद्यालय खंडाळा, तालुका साकोली येथे 1 ऑगस्ट 2025 रोजी शाळेचा वर्धापन दिन, लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे असे तीन कार्यक्रम संयुक्तरीत्या मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले.
         या नियोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. जयवंतजी पर्वते (सेवानिवृत्त शिक्षक), श्री. डी.व्ही.लांजेवार सर (सेवानिवृत्त मुख्याध्यापक), प्रमुख अतिथी म्हणून श्री. सतीशजी लांजेवार (सेवानिवृत्त प्राध्यापक), श्री शेखरजी निर्वाण (माजी पोलीस पाटील), डि. एल. लांजेवार सर, सौ. व्हि.जी. पोहाणे मॅडम (सेवानिवृत्त मुख्याध्यापिका ), श्री टोलीरामजी लांजेवार, श्री व्यंकटजी उत्तमवार (अध्यक्ष,शा. व्य. स.), श्री. ए. एन. निर्वाण (मुख्याध्यापक),  श्री.गिरिधारी लांजेवार, श्री.नीलकंजी कापगते, श्री महारुजी पुस्तोडे, श्री.भोजरामजी करंजेकर, श्री.बारीकरावजी गडपायले, श्री अर्जुनजी थेर, श्री.मारोती मेश्राम, राजेश्वरजी मेश्राम इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
         कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली, त्यानंतर स्व. वसंतराव पाटील लांजेवार (संस्थापक, अध्यक्ष टिळक विद्यालय खंडाळा ), लोकमान्य टिळक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला  पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. विद्यालयाच्या 66 वा वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाचे उपाध्यक्ष डी. व्ही. लांजेवार सर (माजी मुख्याध्यापक) यांच्या हस्ते विद्यालयाचे ध्वजारोहण करण्यात आले.
        विद्यालयाचे मुख्याध्यापक ए. एन. निर्वाण सर यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करून विद्यालयाची संपूर्ण यशोगाथा व्यक्त केले, आजच्या विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यापासून प्रेरणा घेणे अत्यंत गरजेचे आहे, असे मौलिक विचार ठेवले.
         प्रमुख पाहुणे श्री. सतीशजी लांजेवार यांनी  विद्यार्थ्यांशी संवाद साधताना विद्यालयाच्या कार्याची प्रशंसा करून शहरी भागातील शिक्षणापेक्षा ग्रामीण भागातील मराठीतून दिले जाणारे शिक्षण चिरकाल टिकणारे दर्जेदार शिक्षण असते असे विचार ठेवले  तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष जयवंतजी पर्वते सर आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना म्हणाले, या विद्यालयातून आजपर्यंत अनेक विद्यार्थी घडले आहेत. पुस्तकी ज्ञानच नव्हे, तर सुसंस्काराचे धडे गिरवून या शाळेचे माजी विद्यार्थी डॉक्टर,इंजिनिअर, प्राध्यापक तसेच मोठमोठ्या शासकीय पदांवर कार्यरत आहेत, अशाप्रकारे कर्तृत्ववान नागरिक घडवणाऱ्या या शाळेचा गुणगौरव करून लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन समाजासाठी योगदान देण्याचे आवाहन केले.
          याप्रसंगी श्री. शेखरजी निर्वाण, टोलीरामजी लांजेवार, सौ. पोहाणे मॅडम, अर्जुनजी थेर इत्यादी मान्यवरांनी आपले मनोगतातून विद्यालयाचा ऐतिहासिक गुणगौरव करून लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला.
          याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विद्यालयावर आधारित सुंदर अशा शब्दरचनेतून गुणगौरव गीत सादर केला. अनेक विद्यार्थ्यांनी गीत व भाषणे सादर करून उपस्थितांचे मने जिंकली.
          या तिहेरी सोहळ्याचे औचित्य साधून विद्यालयामध्ये मान्यवरांचे हस्ते वृक्षरोपण करण्यात आले.
        कार्यक्रमाचे संचालन आर. जे. करंजेकर व एम. डि. मेश्राम मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन एम. यु.मेश्राम मॅडम यांनी केले.
         कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता पी.एन. कापगते सर, डी.डी. तुमसरे सर,ए. पी. काशिवार सर,एन. डि. टेंभुर्णे,पि. एस. मुंगुलमारे,एस. एम. मेंढे, डि. एम.रोकडे इत्यादी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या