Ticker

6/recent/ticker-posts

स्व. किशोर साहू सांस्कृतिक प्रतिष्ठानचा कलावंत सन्मान सोहळा




चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा :-चित्रपट सृष्टीत आपले अतुलनीय योगदान देणाèया भंडाèयाचा कलावंताची ओळख कला क्षेत्रातील नव्या पिढीला व्हावी आणि अशा कलावंतापासून उदयोन्मुख कलावंताना प्रेरणा मिळावी या हेतूने स्व. किशोर साहू सांस्कृतीक व कला प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली आहे. साहू यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून 25 ऑगस्ट रोजी मान्यवर कलावंत व साहित्यिकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
जुना काळातील चित्रपट सृष्टीत विविध चित्रपटांमध्ये अभिनय, चित्रपटांचे दिग्दर्शन, कलालेखन अशा विविध माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाèया किशोर साहू यांचा परिचय अजूनही नव्या पिढीला नाही. साहू यांनी त्यांच्या कलागुणांचा बळावर भंडारा जिल्ह्याचे नाव कलाक्षेत्रात मोठे केले. मात्र अशा कलावंताची ओळख आम्हाला नसणे, हे खेदाचे आहे.
साहू यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आणखी चांगले कलावंत जिल्ह्यात उदयास यावेत, कलावंताच्या अडीअडचणी जाणून घेत त्यांचे समाधान शोधण्याच्या दृष्टीने स्व. किशोर साहू सांस्कृतीक कला प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली आहे. साहू यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून 25 ऑगस्ट रोजी भंडारा येथील सार्वजनिक वाचनालयात संध्याकाळी 6 वाजता कलावंत साहित्यिक यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. कलाक्षेत्रातील विविध मान्यवरांचा सन्मान यावेळी केला जाणार आहे. 
कवी व कादंबरीकार डॉ. उपेंद्र कोठेकर कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील. उद्घाटन आ.डॉ. परिणय फुके यांच्या हस्ते होणार आहे. पद्श्री डॉ. परशुराम खुणे प्रमुख वक्ता म्हणून असतील. सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष धनंजय दलाल प्रमुख अतिथी राहणार आहे.
कलाक्षेत्रात उभ्या होत असलेल्या या चळवळीला आधार देण्यासाठी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुकेश थानथराटे, सचिव सईद शेख, उपाध्यक्ष प्रशांत खोब्रागडे यांनी केले आहे.
...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या