Ticker

6/recent/ticker-posts

अल्पवयीन आदिवासी मुलीला ५ लाख ६५ हजार रुपयाला विकले;जुगनी येथील धक्कादायक घटना

मुलींना पैशांनी विकणारे दलाल समाजात वाढले- सुशिलकुमार पावरा


चित्रा न्युज प्रतिनिधी 
धडगांव : चाकरा इंद्या वळवी वय १६ राहणार जुगनी तालुका धडगांव जिल्हा नंदुरबार या अल्पवयीन आदिवासी मुलीला दिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजी पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे अनोळखी व्यक्तीला ५ लाख ६५ हजार रूपयांनी मुलीचा मामा श्री.धाकल्या जाहग-या तडवी,श्री.सोन्या पु-न्या वळवी( आजोबा),श्री.माणिकराव सोन्या वळवी चूलत भाऊ ),श्री.दारासिंग सोन्या वळवी चुलत भाऊ,श्री.अनिल राहला वळवी चुलत भाऊ,श्री.ईस्माईल राहला वळवी  चुलत भाऊ, श्री.गणेश इंद्या वळवी सख्या भाऊ यांनी विकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.माझ्या पत्नीला साकरा हिला माझ्या जुगनी येथील घरातून जबरदस्तीने बोलेरो गाडीत बसवून पंढरपूर येथे नेले आहे.मी माझ्या पत्नीला वाचवण्याचा प्रयत्न केला तेव्हा वरील व्यक्ती मला अश्लील शिवीगाळ करीत धमकी व दमदाटी करून लाथा बुक्यांनी मारहाण केली. याबाबत मुलीचा कथित पती पोहल्या पाडवी  यांनी पोलीस अधीक्षक नंदूरबार व पोलीस निरीक्षक म्हसावद यांना तक्रार अर्ज दिला आहे व माझ्या पत्नीला पैशांनी  विकणा-यांवर गुन्हा दाखल करून  अटक करा व कायदेशीर कडक कारवाई करा,अशी मागणी केली आहे.
               आदिवासी समाजात पैशांनी मुलींना विकणारे दलाल वाढले आहेत.त्यांच्यात माणूसकी नाही व नातेसंबंधांला अर्थ नाही.एखाद्या जनावरासारखे मुलींचा पैशाने सौदा करतात व जो जास्त पैसे देईल त्याला विकून टाकतात व मुलीचे संपूर्ण आयुष्य अद्धवस्त करून टाकतात. वय १३ वर्षे असतांना पोहल्या पाडवी या इसमाने या अल्पवयीन मुलीला पळवून नेले व लग्न केले.गेल्या ३ वर्षांपासून ते एकत्र राहत होते.मुलगी १३ वर्षाची असतांना ज्यांनी तिला पळवून नेले ,तो पती सुद्धा गुन्हेगार आहे.कारण मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय मुलीला पळवून नेणे किंवा लग्न करणे हा गुन्हा आहे.
                   खेळण्या- कुदण्याच्या, शिकण्याच्या अल्प वयामध्ये ह्या मुलीवर अत्याचार सुरू आहे.वडील नसल्यामुळे अनाथासारखे जीवन जगत आहे.त्या मुलीला ५ लाख ६५ हजार रूपयांनी ज्याने विकत घेतले,तर व्यक्ती त्या मुलीशी संसार करणार नाही.देहव्याव्यार सारख्या वाईट मार्गाला लावेल,अशी शंका निर्माण होते. या मुलीवर १३ वर्षाची असतांना पतीकडून व आता १६ वर्षांची असतांना दलालांकडुन लैंगिक, शारीरिक व मानसिक अत्याचार झालेला आहे.दोन्ही बाजूंकडून मुलीवर अत्याचार झाला आहे.म्हणून या अल्पवयीन मुलीला ज्यांनी कोणी ५ लाख ६५ हजार रूपयांनी विकले आहे,त्यांच्यावरच कायदेशीर कडक कारवाई झाली पाहिजे व पोलिसांनी  मुलीचा शोध घेऊन आईच्या ताब्यात सुरक्षित दिले पाहिजे,अशी आमची बिरसा फायटर्स संघटनेची मागणी आहे,अशी प्रतिक्रिया बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या