चित्रा न्युज प्रतिनिधी
वर्धा :-सायन गुरु नानक कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स (स्वायत्त) येथील संविधान क्लब व राज्यशास्त्र विभागाच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुण्यतिथी आणि क्रांतिकारक शिवराम हरि राजगुरू यांच्या जयंतीनिमित्त निमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या भाषाशैलीतून देशभक्तांच्या विचारांना उजाळा दिला आणि त्यांच्या प्रेरणादायी जीवनाचा गौरव केला. सदर कार्यक्रमामध्ये पोस्टर मेकिंग आणि घोषवाक्य लेखनाची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. संविधान क्लब आणि राज्यशास्त्र विभाग यांनी विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, नेतृत्वगुण आणि राष्ट्रसेवेची भावना जागवण्याचा संदेश दिला. दरम्यान काव्यवाचन देखील करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य आद. रामराज नादार सर उपस्थित होते त्याचप्रमाणे इतर प्राध्यापक व विद्यार्थी यांची उपस्थिती होती. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील या दोन महान विभूतींना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.
या कार्यक्रमाचे आयोजन राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.सुमित खरात यांच्या नेतृत्वात आणि संविधान क्लबचे समन्वयक प्रा.अनिकेत उबाळे यांच्या सहकार्याने करण्यात आले.
0 टिप्पण्या