चित्रा न्युज प्रतिनिधी
अकलूज :-अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या निर्माण शास्त्र महाविद्यालय (पदविका) येथे भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिना निमित्त शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह जयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शना खाली हर घर तिरंगा अभियानाचे आयोजन करण्यात आले.भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार व पंतप्रधान यांनी केलेल्या आवाहनानुसार हर घर तिरंगा म्हणजे घरोघरी तिरंगा या अभियानाच्या अनुषंगाने महाविद्यालयाच्या वतीने हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत १२ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत महाविद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये रांगोळी स्पर्धा,हर घर तिरंगा रॅली तसेच सेल्फी विथ फ्लॅग अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
हर घर तिरंगा अभियान राबविण्यामागे समाजात राष्ट्रप्रेम निर्मित करणे,नागरिकांच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत करणे आणि राष्ट्रध्वजाची जाणीव वाढवणे हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट होते.या अभियानात महाविद्यालयाचे प्राचार्य नानासाहेब देवडकर,सर्व विद्यार्थी- विद्यार्थिनी,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनीच उत्साहपूर्वक सहभाग नोंदवला होता.
0 टिप्पण्या