⭕ महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील इंडियन पोलीस मित्रांना पुरस्कार .
⭕उल्लेखनीय कामगिरी बद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार.
चित्रा न्युज प्रतिनिधी
नागपूर :- देशाला एकत्र करून ठेवण्याचे जनहितार्थ कार्य स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या तत्वप्रणालीने आपल्या भारतीय संविधानानुसार सुरू आहे. अलीकडे इंडियन पोलीस मित्र संघटनेच्या वतीने सामाजिक जागरुकता व सेवाभावाचे उत्कृष्ट आदर्श निर्माण केले आहे.स्वच्छता मोहीम ,नदी नाले ,घाट सफाई, वृक्षारोपण, औषध वाटप, अन्नदान, विविध यात्रा,व गर्दीच्या ठिकाणी पोलिस दला सोबत दिलेली सेवा, "गरजू" लोकांना वेळोवेळी मदत, सहकार्य मार्गदर्शन केले जाते.विविध उपक्रमातून देशासाठी समाज, संस्कृती, संस्कार, शिक्षण, या क्षेत्रात कामगिरी बजावणाऱ्यांना " सामाजिक प्रेरणा पुरस्कार " देऊन गौरविण्यात येते. इंडियन पोलीस मित्र संघटनेचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष हंसराज उराडे यांना समाजात उच्च मान सन्मान स्थान देत आणि पुढेही त्यांनी अनेक सामाजिक, शैक्षणिक आणि देशहितासाठी कार्य करावे, त्याचे कार्य पुढील पिढीला नेहमीच प्रेरणादायी ठरावे यासाठी त्यांना कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य दिव्य कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सामाजिक प्रेरणा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले .
डॉ. सुरेश डी. एस. राठोड फाउंडेशन व मार्शल योगा अकॅडमी संचालित इंडियन पोलीस मित्र भारत आणि डॉ. सुशील अग्रवाल हेल्थ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय पुरस्कार 2025 सोहळा कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन येथे भव्य दिव्य स्वरूपात पार पडला.
जीवनाला अर्थ देत उरलेले प्राण देशकार्यासाठी आहे याची जाणीव या कार्यक्रमात करून दिली.
हंसराज उराडे यांच्या विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय पुरस्कार साठी निवड केली. आणि कोल्हापूर येथे सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून गगनगिरी पळसंबे, मठाचे मठाधिपती बाळकृष्ण गुरुजी महाराज, पोलीस उपअधीक्षक सदानंद सदांशिव, दैनिक रोखठोकचे संपादक सुरेश माडकर, मराठी चित्रपट अभिनेते संजय मोहिते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन डॉ. सुरेश राठोड, डॉ. सुशील अग्रवाल, डॉ. कृष्णदेव गिरीजी महाराज, डॉ. वैद्य गुंडोपंत सुतार, आणि विठ्ठल मूर्केवार यांनी अथक परिश्रम केले.
या कार्यक्रमात देशभरातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १०५ मान्यवरांना “राष्ट्रीय पुरस्कार 2025” प्रदान करून सन्मानित करण्यात आले. प्रत्येक सन्मानार्थीस शाल, श्रीफळ, फेटा, मोमेंटो व प्रमाणपत्र अशा स्वरूपाने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार वितरणापूर्वी देशभक्तीपर गीत लावण्यात येऊन वातावरण राष्ट्रभक्तीने भारले गेले. सर्व मान्यवरांचे पारंपरिक फेट्यांनी स्वागत करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंडियन पोलीस मित्र भारतच्या पब्लिक रिलेशन ऑफिसर सानिका परबकर यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. या यशस्वी आयोजनामध्ये गायत्री तेली, मानसी शिंदे, दीपिका यादव, प्रकाश कदम, अनिता काळे, शशिकांत बामणे, मेहबूब माणगावे, अशोक सूर्यवंशी यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. पुरस्कार विजेत्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, "आतापर्यंत अनेक कार्यक्रम पाहिले, पण इतका भव्य, दिव्य आणि आकर्षक सोहळा प्रथमच अनुभवला. हा पुरस्कार म्हणजे आमच्यासाठी प्रेरणादायी शिदोरी आहे." असे मनोगत व्यक्त केले.
0 टिप्पण्या