जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन श्मशान भूमीत असंविधानिक फलक लावणाऱ्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना तात्काळ बरखास्त करा
चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा- शहरातील सर्व धर्मिय बांधव गेली कित्येक वर्षांपासून वैनगंगा नदीच्या काठावर असलेल्या स्मशानभुमी मधे प्रेतांची विल्हेवाट किंवा अंत्यविधि करीत आलो आहोत.
आजपर्यंत कोणीही अथवा कोणत्याही सरकारी संस्थेने सदर जागेवर अंत्यसंस्कार करण्यास कोणत्याही धर्मियास मनाई केलेली नव्हती.
परंतु आता काही दिवसांपासून स्मशान भूमी च्या दर्शनी भागात भंडारा नगर परिषदेद्वारे मुख्याधिकारी यांच्या आदेशां नुसार एक फलक वजा सूचना दिलेली आहे की, या स्मशान भूमी मधे हिन्दू धर्मियांशीवाय कोणत्याही धर्मियांना अंत्यसंस्कार करण्यास मनाई करण्यात येत आहे .
असा फलक लावणे हे देशाच्या एकात्मकते साठी व सामाजिक सौधार्य या साठी हानिकारक आहे. संविधानाच्या धर्मनिरपेक्षतेच्या मूल्याची जबाबदार शासकीय अधिकाऱ्यां कडून होणारी अशी पायमल्ली अपेक्षित नाही.
असा फलक लावल्याने आम्ही बौद्ध समाजातील लोकांच्या मनात असुरक्षितते ची भावना निर्माण झालेली आहे. आजकाल देशातील राजकीय वातावरण बघता अशी असुरक्षितते ची भावना निर्माण होने क्रमप्राप्त आहे.
आमच्या बौद्धांचे शव जर अंत्यसंस्कारा साठी भंडारा स्मशानभुमीत गेले तर त्यांच्यावर नगर परिषदे कडून कार्यवाही चा बडगा उगारल्या जाइल .
सदर बाब लक्षात घेता आम्ही सर्व बौद्ध समाज बंधु आपणास विनंती करतो की, आमच्या बौद्ध समाजाच्या लोकांचे अंत्यसंस्कार करण्याकरिता दूसरी जागा उपलब्ध करुन द्यावी , ही विनंती.
तसेच आपल्या अधिकाराचा वापर करुन अशे असंवैधानिक फलक लावून इतर धर्मियांचा संविधानिक अधिकार नाकारणाऱ्या धर्मांध शासकीय अधिकाऱ्यावर कठोर कारवाही करुन त्याला शासकीय सेवेतुन बड़तर्फ करण्यात यावे.
निवेदन देताना आसित बागडे,मनोज बागडे ,राजेश मडामे, हंसराज वैद्य ,रमेश जांगडे ,रोशन जांभुळकर, रणजीत मडामे, मोरेश्वर गेडाम, अंकुश वंजारी, विनय बनसोड, तुळशीराम शेंडे, दिलीप वानखेडे, रणजीत मडामे, ज्ञानचंद जांभुळकर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
0 टिप्पण्या