चित्रा न्युज प्रतिनिधी
गोंदिया :-गोरेगाव पंचायत समितीचे माजी उपसभापती सुरेंद्र बिसेन यांची नुकतीच भाजपा गोंदिया जिल्हा सचिव पदी निवड झाली असून या निवडीमुळे गोरेगांव तालुक्यात उत्साहाचे वातावरण पसरले आहे. या यशाबद्दल भाजपाचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार केला.
यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते, ज्यामध्ये भाजपाचे घनश्यामजी कटरे, आनंदजी कटरे, निरजजी दुबे, ओमचंदजी पटले, टेकेश्वरजी भगत,गोविंदजी भैरम,
लालचंदजी अंबुले, सुरेंद्रजी अंबुले, देवाभाऊ राहांगडाले, देवराजजी ठाकरे,सुरेंद्रजी डुंबरे, प्रेमलालजी पटले, दिलीपभाऊ पटले,गणेशजी येरणे, हेमराजजी उईके,
विजयजी कटरे ईत्यादी भाजपा कार्यकर्त्यांनी जयघोष करत, पुष्पगुच्छ देऊन सुरेंद्रजी बिसेन यांचे हार्दिक अभिनंदन केले.
या प्रसंगी बोलतांना सुरेंद्रजी बिसेन म्हणाले, "पक्षाने माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसोबत खांद्याला खांदा लावून काम करीन व गोंदिया जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीन."पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व ग्रामस्थांनी त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
0 टिप्पण्या