Ticker

6/recent/ticker-posts

चंद्रखेडा मार्गावरील तांडा व मानोरा गावाजवळील अपघाताचे प्रमाण

 लहान व अरुंद पुलांवर आवश्यक उपाययोजना करण्याची  मागणी

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती : दिनांक ६ ऑगस्ट रोजी भाजपा अभियंता सेलचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य इंजी. जगदीश लवाडिया यांनी उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग भद्रावती श्री.जय तिवारी यांची भेट घेऊन अधिकृत निवेदन सादर केले.
या निवेदनामध्ये संबंधित ठिकाणी पुल अरुंद असल्यामुळे वारंवार अपघात होत असल्याबाबत माहिती देण्यात आली असून, नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खालील उपाययोजना तत्काळ करण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे:
1. पुलाजवळ स्पष्ट संकेतफलक (Sign Boards) लावणे
2. वाहनचालकांना सतर्क करणारे सूचना फलक बसवणे
3. रात्रीच्या वेळी दिशादर्शकासाठी रिफ्लेक्टर, रेडियम पट्ट्या व सौर दिवे बसवणे
4. आवश्यकता असल्यास पुलाची रचना व रुंदी वाढवण्याबाबत यंत्रमागातून सर्वेक्षण करणे

श्री. जय तिवारी यांनी सदर निवेदनाची गंभीर दखल घेत लवकरात लवकर उपाययोजना करण्यात येईल असे आश्वासन दिले.
या संदर्भात इंजी. जगदीश लवाडिया यांनी सांगितले की,
“रस्त्यावरील अपघात थांबवण्यासाठी स्थानिक प्रशासनाने त्वरित पावले उचलणे अत्यावश्यक आहे. मी स्वतः या विषयावर लक्ष ठेवून आहे आणि संबंधित कामे पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवणार आहे.”

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या