बोगस खते विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई करून दुकान बंद करा- बिरसा फायटर्सची मागणी
चित्रा न्युज प्रतिनिधी
शहादा : श्री.साई कृषी सेवा केंद्र मंदाणे ता.शहादा जि.नंदुरबार येथे शेतक-यांना बोगस खते विकून लुबाडणूक व फसवणूक करणा-या दुकानदारावर तात्काळ कायदेशीर कडक कारवाई करा व दुकान तात्काळ बंद करा,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदूरबार व तालुका कृषी अधिकारी शहादा याच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,पत्रकार मंगेश वळवी, बिरसा फायटर्स जुगनी गाव शाखेचे अमिताभ वळवी,गणपत वळवी,कांतीलाल पावरा ग्रामपंचायत सदस्य,डाॅक्टर भरत पावरा, राजकुमार पावरा, प्रकाश पावरा,पोहल्या पाडवी,गुलाबसिंग पाडवी आदि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
नंदुरबार जिल्ह्य़ात शेतात पेरणीसाठी बियाणे व खते घेणा-या शेतक-यांची संख्या दुकान विक्रेत्यांकडे वाढली आहे.या गर्दीचा गैरफायदा घेऊन श्री.साई कृषी सेवा केंद्र मंदाणे हा दुकानदार बोगस खते विकून शेतक-यांची फसवणूक व लुबाडणूक करीत आहे.
शेतकरी श्री. मुकेश पटले गांव वडगाव ता.शहादा जि.नंदुरबार यांनी मंदाणे ता.शहादा येथील श्री साई कृषी सेवा केंद्र मंदाणे येथून भगीरथ हा १८,१८,१० या खताच्या वापर केला होता. खताच्या ६ किलोच्या पिशवीत २ किलो वाळू निघाली आहे. ४५ किलोच्या पिशवीत जर १६ किलो वाळू निघत असेल तर शेतकऱ्यांना त्याचा काय फायदा होणार? अशा बोगस खतामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक व पिकांचे मोठे नुकसान होत आहे.
सदर तक्रार त्या दुकानदाराला सांगायला गेलेल्या शेतक-याला "तुला काय करायचे ते करून घे "अशी धमकी देण्यात आली आहे. कंपनी वाले शेतक-याला दबावात आणून सांगता की ,तुला पैसे परत करतो ,परंतू तू तक्रार करू नको.असे कंपनीवाला व दुकान दार म्हणत आहेत. परंतू अशा प्रकारे यांनी बोगस खत विकून अनेक शेतक-यांना फसवले आहे.
बोगस खतांमुळे पिकांची वाढ होत नाही व उत्पन्नात घट होते.शेतक-यांना आर्थिक नुकसान होते.त्यामुळे शेतकरी नैराश्यातून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. म्हणून श्री.साई कृषी सेवा केंद्र मंदाणे या दुकानातील सर्वच खतांची तपासणी करून बोगस खत विक्रेत्यांवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी व दुकान तात्काळ बंद करण्यात यावे,अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून करण्यात आली आहे.
0 टिप्पण्या