भक्तिभाव, सांस्कृतिक उर्जा आणि समाजसेवेचा संगम – गावात निर्माण झाला नवा आदर्श!
चित्रा न्युज प्रतिनिधी
गोंदिया :-मुंडीपार गावागावात अनेक भजन मंडळे दिसतात; पण मुंडीपारच्या दुर्गा चौकातील दुर्गा सेवा भजन मंडळ हे केवळ भजनापुरते मर्यादित नाही, तर समाजसेवेच्या कार्यातही अग्रेसर ठरले आहे. भक्तीभावातून सेवा हा सुंदर मंत्र घेऊन या मंडळाने गेल्या अनेक वर्षांत धार्मिकता, संस्कृती आणि समाजकल्याण यांचे अनोखे मिश्रण घडवले आहे.
मंडळाची सुरुवात भजनाच्या माध्यमातून भक्तिभाव जागवण्याच्या उद्देशाने झाली. मात्र, आज हे मंडळ गावातील सामाजिक कार्यातही अग्रेसर आहे. वर्षभरात हरिनाम सप्ताह, कीर्तन, अभंग गायन, जयंती सोहळे, सांस्कृतिक कार्यक्रम यांचे आयोजन करून हे मंडळ गावात अध्यात्माचा आणि एकतेचा दीप प्रज्वलित करत आहे.
मंडळाचे पदाधिकारी अभिमानाने सांगतात –
“भक्ती ही केवळ पूजा नाही, ती समाजासाठी काहीतरी करण्याची ताकद देते. हेच आमचे ध्येय आहे.”
मंडळाच्या कार्यात तरुणाईचा मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे. पारंपरिक संस्कृतीशी जोडत, समाजसेवेची शिकवण देत हे मंडळ नव्या पिढीला योग्य दिशा देत आहे. गावातील प्रत्येक मोठा कार्यक्रम या मंडळाशिवाय अपूर्ण राहतो, इतका प्रभाव मंडळाने निर्माण केला आहे.
गावकऱ्यांच्या मते, “दुर्गा सेवा भजन मंडळामुळे गावात ऐक्याची भावना वाढली आहे. हे मंडळ फक्त भजनासाठी नाही, तर संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी कार्य करते."
या कार्यामागे समर्पित कार्यकर्त्यांचे मोलाचे योगदान आहे. मंडळातील प्रमुख सदस्यांमध्ये –
गिरीश भाऊ पारधी, नीलकंठ भाऊ पारधी, भुरणलाल राहांगडाले, शामराजजी चौधरी, हरिलालजी पारधी, आनंदरावजी सुरजोसे, डॉ. होमराज राहांगडाले, राजेंद्र बिसेन, नानीकराव सुरजोसे, तेजराम पारधी, चेतलाल पारधी, भिमेश बोपचे, पुरुषोत्तम पारधी, सुरेश पारधी, राजू पारधी, पुरणलाल पारधी, अनिल चौधरी तसेच सर्व सदस्य यांचे योगदान उल्लेखनीय आहे.
भक्तिभावातून सेवा हा मंत्र घेऊन हे मंडळ गावात सौहार्द, संस्कार आणि समाजकल्याणाचा दीप तेजाने पेटवत राहील, असा ठाम निर्धार मंडळाच्या सदस्यांनी केला आहे.
0 टिप्पण्या