विजय चौडेकर चित्रा न्यूज जिल्हा प्रतिनिधी नांदेड
नांदेड -शेतकऱ्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देत (मिडियाशी)प्रसारमाध्यमांशी बोलत असताना अश्रूंचा बांध फुटला ....!
भीषण पूरपरिस्थिती मुळे शेतकरी नेस्तनाबूत झालाय, पिकाची अवस्था खूप वाईट आहे शेतीतील माती वाहून गेली आहे, जनावरे पाण्यात बुडून मेली शेतकऱ्याच्या घरात पाणी शिरलं आहे होत नव्हतं तेवढं तेल मीठ पीठ सर्व काही वाहून गेलं बसायला कोरडी जागा सुद्धा शिल्लक राहिली नाही. पाण्यात वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना चार लाख रुपये अन् विमानात मेलेल्या लोकांना एक कोटी रुपये देता. एवढे प्रचंड हाल होत असताना केंद्रातील एक मंत्री यायला तयार नाही. आणि सरकारने ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज असताना नेते मंडळी मंत्रालयातील एसीच्याकॅबिन मध्ये बसून बिसलेरी बॉटलचे पाणी पिऊन राज्याच्या तिजोरीत पैसे नाहीत असे शहाणपण शिकवत आहेत, अरे बाबा नो, एका एका शेतकऱ्याचे नुकसान पाच पाच लाख रुपयाचे झाले आहे. तुमच्या 8500 रुपयाची अगरबत्ती कुठे लावणार आहात शेतकऱ्याच्या टाळूवरचे लोणी खाणारे लोकं जेव्हा मंत्रालयात बसतात ना ती गोष्ट शेतकऱ्यासाठी फार दुर्दैवी असते. आपले साहेब म्हणतात पैसे नाहीत, लोकसत्ता 26सप्टेंबर 2025 रोजी च्या बातमी नुसार नाशिकच्या कुंभमेळ्याव्यासाठी 1500 कोटी रुपयांचा आराखडा सांगितला जातोय त्यावरून टिका होते पण ते देखील साफ खोटं आहे महाराष्ट्र राज्य सन 2025/2026 मधील अर्थसंकल्पीय तरतूद फक्त 146 कोटी रुपयांची आहे तिथे ही हिंदूची फसवणूक हिंदुनीच केली. सर्व भाजप आमदाराचे एक महिन्याचे वेतन चार कोटी रुपयांच्या आसपास आहे. राज्यातील सरकारी शिक्षकाचे वेतन 80 कोटी, राज्याच्या एका दिवसाचा दारूचा महसूल 70 कोटी रुपयांच्या आसपास आहे, एकूण 154 कोटी पेक्षा जास्त जमा होत नाहीत, हे सर्व एका बाजूला आणि फक्त लाडकी बहीण योजनेचा खर्च ते पण एका महिन्याचा 3500 कोटी रुपये आहे. लाडकी बहीण योजनेचा फक्त एका महिन्याचा हप्ता मराठवाड्यासाठी वळवला तर आपत्तीग्रस्त म्हणजे शेतकरी बांधवांना एकरी 30,000 हजार रुपयापेक्षा जास्त मदत देऊन उभा करणे सहज शक्य आहे. पण तशी नियत नाही केंद्राकडून मदतीचं गाजर दाखवत आहे. मुख्यमंत्री साहेब तुम्हाला शेतकऱ्याने प्रश्न विचारला हेक्टरी किती मदत देता म्हणुन तर तुम्ही त्याला म्हणता राजकारण करू नको. देवा भाऊ तुम्हाला भिंतीवर चित्र काढायला पैसे आहेत पण शेतकऱ्यासाठी नाहीत.उपमुख्यमंत्री अजित दादा म्हणतात कर्जमाफी साठी पैसे नाहीत सगळे सोंग करता येतात पण पैशाची सोंग करता येत नाही असे म्हणून वेळ हाणून नेतात.. साहेब जबाबदारीचे भान ठेवून बोलत जा आपण जबाबदार नेते आहात आणि जबाबदार लोकांनी तुम्हांला निवडून दिलं आहे.मुख्यमंत्र्याच्या बंगल्यावर बेड साठी 21 लाख तर किचनट्रॉली साठी 20 लाख रुपये अन् इकडे शेतकऱ्यासाठी राज्याच्या तिजोरीत पैसे नाहीत.2014 मध्ये सोयाबीन भाव 4000 हजार प्रति क्विंटल होता एक खत बॅग 250 ते 550 रुपये पर्यंत होती आता सोयाबीन भाव प्रति क्विंटल 4000 रुपये इतका आहे आणि खत बॅग 1200 ते 1700 रुपये पर्यंत झाली आहे.. मग शेतकऱ्यांनी कस जगायचं तुम्हीच सांगा महागाई तर आकाशाला टेकली आहे.. पिक विम्यात भ्रष्टाचार दिसून येत आहे..
ई पीक पाहणी करून ई केवासी करा म्हणून एसी कॅबिन मध्ये बसून बिसलेरी बॉटलचे पाणी पिऊन दोन ओळीचा जीआर काढता आणि शेतकऱ्याच्या तोंडावर फेकता. ई पिक पाहणी ची साइड व्यवस्थित चालते का? पिक वाहून गेले जमीन खरडून गेली जनावरे वाहून गेली अख्ख्या संसार उध्वस्त झाला आहे. अहो साहेब इथे शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं आहे जरा संवेदनशील होऊन विचार करा देश तिकडे प्रगती करतोय अन् शेतकरी इकडे जीवन जगण्यासाठी संघर्ष करत आहे. शेतकऱ्याच्या नशिबी संघर्ष आणि संघर्षच का? साहेब शेतकऱ्याच्या दारात मरण मुक्कामी येऊन बसलं आहे आणि मरणाच्या दारात शेतकरी तडपतोय... शेतकरी वाचवा साहेब शेतकरी वाचवा.. सामाजिक
कार्यकर्ता, संदिप धानोरकर,


0 टिप्पण्या