दिनांक 28 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबरला
चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : कलेचा विकास व प्रसार करण्यासाठी व कलावंताच्या सृजनशीलतेला वाव देण्यासाठी स्व. हरिभाऊ जी नागतुरे ग्रामविकास व बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक संस्था वणी व आर्टिस्ट स्पेस ग्रुप नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने वणी येथे राज्यस्तरीय चित्रशिल्प स्पर्धा व प्रदर्शन दिनांक 28 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर 2025 रोजी लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी येथे आयोजित करण्यात येत आहे ही स्पर्धा व प्रदर्शन सर्व पद्धतीतून काम करणाऱ्या कलावंतासाठी व सर्वांसाठी खुले राहील ही स्पर्धा तीन विभागात असून व्यावसायिक कलाकार विद्यार्थी विभाग व शिल्प विभाग स्पर्धा होत आहे कलावंतांनी आपली कलाकृती स्वर्गीय हरिभाऊजी नागतुरे ग्रामीण विकास व बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक संस्था वणी बाजोरिया लेआउट कनकवाडी वणी येथे प्रकाश नागतुरे
यांच्या घरी दि. 01 ऑक्टोंबर ते 10 ऑक्टोबर पर्यंत आणून द्यावी चित्र व शिल्प गटासाठी एकंदर 33 हजार रुपयांचे बक्षिसे व पारितोषक प्रदान करण्यात येईल असे संस्थेचे अध्यक्ष प्रकाश नागतुरे यांनी प्रसिद्ध केले आहे. सर्व वणीकर जनतेने प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.


0 टिप्पण्या