चित्रा न्युज प्रतिनिधी
नाशिक :-मुळडोंगरी ता.नांदगाव जि.नाशिक येथील ग्यानीच्या नाल्यावरील गट नंबर 42 व 45 मध्ये असलेला मातीबांध फुटल्यामुळे बांधा खालील शेतकरी
1)चंद्रकांत गोविंद मढवई (गट नंबर 37/2)
2) अरुण रमेश मढवई (गट नंबर 37/2)
3) प्रशांत संजय मोरे (गट नंबर 41)
यांचे शेतातील मका पिकासोबत, शेतातील माती आंब्याची झाडे वाहून गेले. ओढ्याच्या काठावर असलेल्या विहीरी माती दगड पडून,काठ खचुन बुजल्या गेल्या.
सदरचा माती बांध अतिशय निकृष्ट दर्जाचा दोन अडीच वर्षांपूर्वीच बनवलेला होता. बांधाचे काम एमआरजीएस अंतर्गत न करता पोकलॅण्ड व जेसीबी मशीनच्या साह्याने करण्यात आले. त्यामुळे बांधात पोकळपणा होता. सदर बांध बनवणारा ठेकेदार अथवा संस्थेची देखील चौकशी व्हावी कारण त्यांच्या हलगर्जीपणामुळे आम्हा शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
यासाठी शासन स्तरावरून पंचनामा करावे.


0 टिप्पण्या