जि. प. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व पालकांनी दाखवलेला विश्वास व मला दिलेल्या संधीच सोन करणार.... नागेश कोथळकर
लिंगोजी कदम जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण नांदेड
नांदेड :-हिमायतनगर तालुक्यातील कार्ला पि. येथील जिल्हा परिषद शाळेची वार्षिक शालेय समीतीची निवड दि.29/9/2025 रोजी पार पडली या निवडणुकीत एकुण तीन उमेदवार रिंगणात उतरले होते. यात नागेश सटवाजी कोथळकर, राजेश्वर परमेश्वर लुम्दे, विजय संजय मोरे या उमेदवारा साठी पालकांनी मतदान केले यात नागेश कोथळकर यांनी एकुण 14 मते मिळवून मोठ्या फरकाने विजय संपादन केला कार्ला पि येथील जिल्हा परिषद शाळेला एक उचशिक्षित अध्यक्ष लाभल्याने शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी फायदा होणार आशी पालकांनी आशा व्यक्त केली आहे. मी स्वतः एक शिक्षक आसल्याने विध्यार्थ्यांना योग्य ती दिशा देण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष कोथळकर यांनी सांगितले यावेळी मुख्याध्यापक जाधव सर, शुभम सर, डॉ .गफार कार्लेकर तंटामुक्ती अध्यक्ष , साईनाथ कोथळकर पोलीस पाटील, सुनिल घोडगे माजी सरपंच, भगवान यमजलवाड माजी शा.व्य.समीती अध्यक्ष,राजेश्वर ढाणके, अशोक आचमवाड, गजानन कदम , तुकाराम कदम, गंगाधर वाघमारे, सुधाकर चव्हाण,नागेश कांबळे,शंकर मोरे, अक्षय मोरे, जांबुवंत मिराशे,नागोराव गोनेवाड, बालाजी मोरे, वसंत मिराशे, सयाजी ढाणके, विश्वास घोडगे, रामदास ईठेवाड, व पालक उपस्थित होते.


0 टिप्पण्या