चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा :-शिक्षक हा विद्यार्थ्यांना म्हणजेच भावी पिढीला घडवण्याचे कार्य करत असतो ज्यामुळे समाजाला एक आदर्श नागरिक म्हणून मुलांना उभे राहता येईल अशा या शिक्षकांचा सन्मानाचा दिवस म्हणजे शिक्षक दिन
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवस संपूर्ण भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो ते भारताचे दुसरे राष्ट्रपती एक महान शिक्षण तसेच तत्त्वज्ञ होते शिक्षक दिनाचे औचित्य साधून मा शारदा योग वर्गातर्फे त्यांच्या योग वर्गातील नियमित योग साधिका आणि शिक्षिका सौ अश्विनी निंबार्त, सौ. अनिता टोपरे आणि सौ विशाखा आगलावे यांच्या सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला
कार्यक्रमाचे संचलन चेतना कुबडे आणि आभार प्रदर्शन आशा गिरीपुंजे यांनी केले. कार्यक्रमांमध्ये हेमलता घारड, ममता पटले, सीमा गभणे, ममता ताई, पूजा वाघमारे, रिता डोरले, कोहाड, प्रिया भिवगडे, बबीता गिरीपुंजे, राखी सोनकुसरे, ललिता साखरकर,ममता पटले, वैशाली गिऱ्हेपुंजे, पिंकी साखरकर उपस्थित होत्या.
0 टिप्पण्या