लिंगोजी कदम जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण नांदेड
नांदेड :-हिमायतनगर तालुक्यातिल करंजी गावातील ग्रामपंचायतीच्या नाकर्ते पणाने त्रस्त झालेल्या युवकांनी गावातील अस्वच्छतेमुळे गावातील व्यक्तीच्या आरोग्याची काळजी घेत गेल्या चार आठवड्या पासून करंजी तील युवकांनी गावाच्या स्वच्छतेसाठी एक नवीन उपक्रम हाती घेतला आहे. आठवड्याच्या दर रविवारी सकाळी 2 तास वेळ गावाच्या स्वच्छते साठी देण्याचं तरुणांनी ठरवलं या उपक्रमाला 4 आठवडे पूर्ण झाले आहेत. या चार आठवड्या युवकांनी मारुती मंदिर परिसर, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, गावातील रस्ते नाल्या स्वच्छ करून गावापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. तसेच गावातील नवतरुनानां क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी संदीप तुकाराम शिंदे यांनी "गणराया विघ्नहर्ता का आहे" व "व्यसनमुक्ती "या विषयावर गावातील तरुणांना मोलाचे मार्गदर्शन केले. संदीप शिंदे सुद्धा रविवारी तरुनांच्या श्रमदानात सहभागी झाले... गावातील तरुणांनी यापुढेही जमेल त्या पद्धतीने गावातील श्रमदान करत राहू कोणत्याही राजकीय लोकांनी याच श्रम घेऊ नये असे सांगितले. तरुणांच्या या उपक्रमाचे रंगराव जाधव साहेब,डॉ रामदास परभनकर, तं. मु.अ.रंगराव जाधव पाटील, यांनी तोंड भरून कौतुक केले..
0 टिप्पण्या