Ticker

6/recent/ticker-posts

बल्लारपुर येथे भव्य संत नगाजी महाराज व श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर भूमिपूजन सोहळा संपन्न

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती :  विठ्ठल-रुक्मिणी व संत नगाजी महाराज भक्तीपीठ बहुउद्देशीय सेवा संस्था, बल्लारपूर-बामणी (ता. बल्लारपूर, जि. चंद्रपूर) यांच्या अंतर्गत बल्लारपूर-बामणी शहरात ५,८०० स्क्वेअर फूट क्षेत्रफळामध्ये भव्य श्री विठ्ठल-रुक्मिणी व श्री संत नगाजी महाराज मंदिर बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला.

आज सोमवार, दि. २२/०९/२०२५ रोजी आयोजित या भूमिपूजन सोहळ्यात संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक व सल्लागार मा. अशोकजी इनमवार ,  शंकररावजी मत्ते व शंकररावजी दर्वे यांच्या हस्ते भगवान  विठ्ठल-रुक्मिणी व संत नगाजी महाराज प्रतिमांची विधिवत पूजनविधी व मंदिराच्या बोर्डाचे अनावरण करून मंदिर बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला. 
या मंगल प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष गणेश वनकर, कार्याध्यक्ष प्रशांत वाटकर, उपाध्यक्ष मिथुन हनुमंते, कोषाध्यक्ष अमोल राजुरकर, तसेच पदाधिकारी शंकर चौधरी, सुरज नागतुरे, गजानन चांदेकर, मनोज निंबाळकर, श्रीकांत चौधरी, पंकज श्रीवास्तव, मंगेश जांभुळकर, अशोक धांडे, मंगेश सूर्यवंशी, रवी कोत्तागट्टूवार, सुरेश गजला तसेच सर्व नाभिक समाजबांधव उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या