चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : महाराष्ट्रात महिला व बालकांच्या ऑनलाइन सुरक्षिततेसाठी भक्कम नेटवर्कची निर्मिती - ऑनलाईन शोषणविषयक घटनांवर प्रभावी प्रतिसाद व ऑनलाइन अत्याचाराच्या पीडितांसोबत कसे काम करावे संदर्भातील रति फौंडेशन, मुंबई तर्फे आयोजित केलेले एकदिवसीय विशेष प्रशिक्षण
रति फौंडेशन, मुंबई तर्फे महाराष्ट्र नेटवर्क ऑनलाईन सेफ्टी या उपक्रमांतर्गत “ऑनलाईन सुरक्षितता, ऑनलाईन शोषणावरील प्रभावी प्रतिसाद आणि पीडितांसोबत कार्य” या विषयावर एकदिवसीय विशेष प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन आज छ . संभाजी नगर येथे करण्यात आले.
या प्रशिक्षण मालिकेअंतर्गत आतापर्यंत पाच सत्रे पार पडली आहेत, पहिले व दुसरे सत्र मुंबईत, तिसरे कोल्हापूरमध्ये चौथे सत्र पुण्यात आणि पाचवे सत्र १९ सप्टेंबर रोजी छ . संभाजी नगर येथे झाले. या मालिकेत महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांतील विविध विभाग व संस्थांचे स्टेकहोल्डर्स मोठ्या संख्येने सहभागी झाले.
कार्यशाळेत बाल कल्याण समिती (CWC), किशोर न्याय मंडळ (JJB), जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, DCPU अधिकारी-कर्मचारी, ICPS अंतर्गत कार्यरत अधिकारी, समुपदेशक, सामाजिक कार्यकर्ते तसेच शाळा व समुदाय स्तरावर मुलांशी प्रत्यक्ष संवाद करणारे कर्मचारी उपस्थित होते.
या प्रशिक्षणात रति फौंडेशन अंतर्गत कार्यरत राष्ट्रीय ऑनलाईन सुरक्षा हेल्पलाईन “मेरी ट्रस्टलाइन” (6363176363) विषयी सविस्तर माहिती देण्यात आली. या हेल्पलाईनमार्फत मागील तीन वर्षांत देशभरातील ५०० हून अधिक पीडितांना तांत्रिक, कायदेशीर व मानसिक सहाय्य मिळाले असून, १००० पेक्षा अधिक आक्षेपार्ह अकाउंट्स हटवण्यात आले आहेत. महाराष्ट्रातून सर्वाधिक तक्रारी नोंदवल्या गेल्याचेही यावेळी समोर आले
प्रशिक्षण सत्रे उमा सुब्रमणियन, सिद्धार्थ पिल्लई, प्रणाली ठाकूर आणि सलमान मुजावर यांनी घेतली, तर जस्टिन मार्डी आणि उर्मिला सावर्डेकर यांनी सहकार्य केले.
या कार्यशाळेत खालील मुद्द्यांवर सविस्तर मार्गदर्शन झाले–
ऑनलाईन शोषणाच्या घटनांची ओळख प्रभावी प्रतिसाद व कायदेशीर प्रक्रिया ऑनलाईन सुरक्षिततेची तंत्रे व मानसिक परिणाम सोशल मीडियावरील रिपोर्टिंग प्रणालींचे आकलन
डॉक्सिंग, मॉर्फिंग, AI-डीपफेक्स यांसारख्या नव्या धोक्यांची ओळख
सहभागींना सोशल मीडिया रिपोर्टिंग प्रणाली व ऑनलाईन सुरक्षितता संदर्भातील उपयुक्त माहिती असलेली मल्टिमिडीया टूलकिट देण्यात आली. प्रशिक्षणानंतर ते या विषयावरील नेटवर्कचा भाग होणार असून, नव्या घडामोडींची माहिती नियमित मिळत राहील.
सुरक्षित डिजिटल महाराष्ट्र घडवण्यासाठी स्थानिक यंत्रणा आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे नेटवर्क अधिक सक्षम करणे आवश्यक आहे, असे रति फौंडेशनच्या तज्ज्ञांनी यावेळी सांगितले. या चळवळीत सहभागी झालेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील उत्कर्ष पुरोगामी महिला व बालकल्याण संस्था बेलगाव त. भद्रावती यांचेशी पीडितांनी मदतीसाठी संपर्क साधावा असे प्रकल्प समन्वयक गजानन घुमे (८७८८०८९५१३) यांनी आवाहन केले आहे.


0 टिप्पण्या