Ticker

6/recent/ticker-posts

जामखेड कडकडीत बंद, दोन तास रस्ता रोको आंदोलन;साळवे कुटुंबावर हल्ल्यातील आरोपींना बारा तासात अटक करा अन्यथा पुढचे आंदोलन नगरला, तेथे न्याय न मिळाल्यास निळ्या झेंड्यानी मुंबई पॅक करू - पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार...


सुजित एस. धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं. 7058137098/9615179615

जामखेड - रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे कुटुंबावर प्राणघातक हल्ला होऊन पंधरा दिवस उलटले तरी यातील आठ आरोपी अद्याप अटक केले नाही. या सर्व आरोपींना अटक करून त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करावी व त्यांना शिक्षा होईपर्यंत साळवे कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावे. आरोपी अटक न केल्यास यापुढचे आंदोलन नगरला व तेथे न्याय न मिळाल्यास मुंबई निळ्या झेंड्यानी पॅक करू असा इशारा ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी रविवारी झालेल्या रस्ता रोको आंदोलनात केले. 
रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या कुटुंबियांवर प्राणघातक हल्ल्यातील सर्व आरोपींना अटक करून मोका अंतर्गत कारवाई करावी या मागणीसाठी आंबेडकर समाजाच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले यांनी रविवारी जामखेड बंद व रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या रस्ता रोको आंदोलनात आँल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार बोलत होते. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते अँड.अरुण जाधव होते. माजी नगराध्यक्ष निखिल घायतडक,प्राचार्य विकी घायतडक, समता ग्रुपचे अध्यक्ष संतोष गव्हाळे, सुनिल जावळे, राजन समिंदर सर, रवी सोनवणे, किशोर कांबळे, वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष आतिश पारवे,जेष्ठ नेते प्रकाश सदाफुले, सचिन सदाफुले,माजी संचालक सागर सदाफुले,राजेंद्र सदाफुले,महिला नेत्या सुरेखा सदाफुले,रोहीणी सदाफुले भुम परांडा पाटोदा या तालुक्यातील पदाधिकारी व हजारोंच्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते
यावेळी बोलताना दिपक केदार म्हणाले, साळवे कुटुंबावर झालेला हल्ला हा त्यांच्यावर नसुन तो आंबेडकरी चळवळीवर आहे. सदर गुंड कोणाचे आहेत. हल्ला होऊन पंधरा दिवस झाले तरी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे व आ रोहित पवार यांनी साळवे कुटुंबाला साधी भेट सुध्दा दिली नाही याचा खेद वाटतो. राम शिंदे ढोल वाजवण्यात मग्न आहे तर रोहीत पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत आयपीएस अधिकारी प्रकरणात सारवासारव करीत ट्वीट करत आहे. या हल्ल्याबाबत का ट्वीट केले नाही असा सवाल केदार यांनी करून यापुढे असे प्रकार झाले तर जश्यास तसे उत्तर दिले जाईल. 
सरकारला कबुतर, गाया, हत्ती याबाबत चिंता आहे. येथे मुडदे पडले तरी गृहमंत्री तुम्ही कोठे आहेत. या आरोपींना अटक का होत नाही यांचा मोरक्या कोण आहे. यांना कोणाचा आशिर्वाद आहे. कुणाचाही नादी लागा पण आमच्या नादी लागू नका असा इशारा केदारे यांनी दिला. 
यावेळी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते ॲड. अरुण जाधव म्हणाले, अशा घटना घडत आहेत ही खेदाची बाब आहे अशा वेळी आपल्या बरोबर कोण येतो, आपल्या दुःखात कोण साथ देतो याचा विचार करण्याची वेळ आली आहे. मी ३५ वर्षा पासुन संघर्ष करीत आहेत. ३१ आँगस्टला आम्ही आमच्या भटक्यांची ताकद दाखवली आहे. साळवे कुटुंबावर झालेला प्राणघातक हल्ल्यातील आरोपींना पाठीशी न घालता अटक करा अशी मागणी अँड. अरूण जाधव यांनी केली. 
चौकट 
रिपाई जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या कुटुंबियांवर प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ जामखेड बंद कडकडीत  पाळण्यात आला आहे तसेच दोन तास रस्ता रोको आंदोलन  करण्यात आले. यावेळी नगर बीड रोड च्या दोन्ही बाजुंनी वाहनांच्या लांबच लांबा रांगा लागल्या होत्या. यावेळी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी त्यांनी आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल असे आश्वासन दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या