Ticker

6/recent/ticker-posts

शेत रस्त्यावर अतिक्रमणमग ई-पीक पाहणी करावी कशी? सरसकट मदतीची हाळी येथील शेतक-यांची मागणी


चित्रा न्युज प्रतिनिधी 
लातूर:-आर्थिक व मानसिक नुकसान तसेच कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ हा शेतकरीबांधवांच्या ५ वी लाच पुजलेला असतो.तरीही बिचारा शेतकरी आलेल्या संकटाला मोठ्या धैर्य्याने तोंड देतोच.पण,शासन माञ सरसकट मदत न देता पंचनामे तसेच ई पीक पाहणी या सारख्या भुईचक्रा मध्ये अडकवूण शेतक-यांची सगळी कोंडी करुन सोडते.अगदी असाच कांहीसा प्रकार यंदाही नैसर्गिक संकटातील सामान्य शेतक-यांच्या बाबतीत होत असून अतिव्रष्टीबाधित पिकांना भर पाई मिळण्यासाठी पंचनामे,ई-पीक पाहणी करणे राज्य शासनाने बंधनकारक केले असून याची मुदत ३० सप्टेंबर रोजी संपते. तरीही अद्याप हाळी हंडरगुळी सह परिसरातील असंख्य शेतकरी सर्व्हर डाऊन सह शेत रस्ते उप्लब्ध नसणे. तसेच वडिलोपार्जित आणी शिव रस्त्यावर अतिक्रमण केल्याने शेत रस्ताच उप्लब्ध नाही.या सारख्या कारणाने ई-पीक पाहणी,पंचनामे या पासून वंचित आहेत.म्हणुन नको ती ई-पीक पाहणी सरसकट मदत करा. अशी मागणी हाळी-हंडरगुळी सह परिसरातील समस्त शेतकरीबांधव करत आहेत.नेहमीच येतो पावसाळा या प्रमाणे नेहमीच येतो दुष्काळ.ही म्हण शेतकरीवर्गासाठी तंतोतंत लागू पडते त्यात आता ई-पीक पाहणीची अट मारक ठरत आहे.कारण,ज्यांना वाट आहे त्यांना पावसामुळे व चिखला मुळे शेतात जाता येईना.तर कांहींना वाटेअभावी जाता येईना. यामुळे असे शेतकरी ई-पीक पाहणी पासून कोसो मैल दुरच आहेत.आणि ईपीक पाहणी अभावी हे शेतकरी भरपाई मिळण्यापासून वंचित राहणार का? अगोदरच अतिपाऊस त्यात शेताकडे जाण्यासाठीअसलेला वडीलोपार्जीत  शेतरस्ता शेजारील शेतक-यांनी अतिक्रमण करुन बंद केल्याने शेतात जायचे कसे.आणि पंचनामा व ई-पीक पाहणी करायची कशी?असे प्रश्न हाळी (ता.उदगीर) येथील शेतकरी प्रशासनाला विचारत आहेत.
उदगीर तालुक्यातील सर्वच मंडळात यंदा अनेकदा ढगफुटी सारखा मोठा पाऊस झाला.यामध्ये पिके पाण्यात अडकली.त्या पिकांच्या पंचनाम्याचे आदेश शासन,प्रशासनस्तरावरुन देण्यात आल्याने अनेकांनी आपल्या आपल्या परिने पंचनामे वगैरे करुन घेतले.पण अद्याप हे काम संपले नाही.तरीही पाऊस पडतोच आहे.या मुळे पंचनामे,ई-पीक पाहणी करता येईना.तेंव्हा नको ती ई-पीक पाहणी सरसकट मदत देण्याची शेतकरी वर्गातून मागणी होत आहे.
शेत रस्त्यावर अतिक्रमण..!
ई-पीक पाहणी करायची कशी?
आधीच अडचणीत असलेल्या सर्वच शेतक-यांना यंदा अतिपावसाने पुर्ण पणे दु:खात व कर्जात टाकले आहे. तर झालेल्या नुकसानीची भरपाई हवी असेल तर ई-पीक पाहणी करणे शासनाने बंधनकारक केले आहे.यात शेतरस्ता असलेले कांहीजण खटपट करुन ई_पीक पाहणीसाठी धडपड करतात.माञ,शेती अस्तित्वात आली तेंव्हा पासून वापरात असलेला,वाड वडिलोपार्जित असलेला शेतरस्ता शेजारील मुजोर शेतक-यांनी त्यावर अतिक्रमण करुन बंद केल्याने कांही शेतक-यांना शेतात ये-जा करणे महा कठीण झाले आहे.सस्ती अदालतीत याची रितसर तक्रार देऊन ५ महिने झाले. तरीही तहसीलदार वा महसूल खाते या तक्रारीकडे अद्याप ढुंकूणही बघीतले नाही.तेंव्हा अशा शेतकरी वर्गानी ई-पीक पाहणी करायची कशी?
सर्व प्रथम हाळी येथील अनेकांच्या शेतरस्त्यावरचे अतिक्रमण काढण्याचे धाडस उदगीरच्या तहसीलदाराने दाखवावे.आणि असे धाडस दाखवल्यावरच शेतक-यांना ई-पीक पाहणी व पंचनामे करता येईल.तेंव्हा तहसीलदार शेतरस्त्यावर केलेले अतिक्रमण काढणार का? व कधी? याकडे हाळीतील त्या समस्त शेतक-यांचे लक्ष लागले आहे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या