चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त भद्रावती तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन जिल्हा चंद्रपूर यांच्या वतीने ग्रामीण रुग्णालयात सामाजिक उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमांतर्गत रुग्णालयातील रुग्णांना फळे व इतर साहित्य वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मनीष कुमार सिंग तालुका अध्यक्ष अविनाश पारोदे जिल्हा उपाध्यक्ष ग्रामीण अशोक येरगुडे उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी रुग्णांना दिलासा मिळावा या हेतूने अशा सामाजिक उपक्रमांना सातत्याने राबविण्याची महत्त्व अधोरेखित केले.
या कार्यक्रमानंतर जमघट फूड प्लाझा इथे छोट्या सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेत भद्रावती येथील जेष्ठ केमिस्ट फार्मसी व फार्मासिस्ट बद्दल सखोल ज्ञान असणारे कुशल व्यक्तिमत्व फार्मासिस्ट काशिनाथ ढेगंळे आमच्यातून निघून गेले त्यांच्यासाठी सर्व केमिस्ट बांधवांकडून दोन मिनिटे उभे राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या दोन्ही कार्यक्रमासाठी उपस्थित केमिस्ट बांधव तालुकाध्यक्ष अविनाश पारोदे, जिल्हा उपाध्यक्ष ग्रामीण अशोक येरगुडे व ज्येष्ठ केमिस्ट श्याम जोशी, संजय गुंडावार, अनिल गुंडावार, प्रवीण सातपुते तसेच सचिन कुटेमाटे, नरेंद्र परमोरे, शेखर ढवस, उमेश पायगन, महेंद्र ठमके, अतुल कुचनकर, गणेश निमकर व अभय चवले इतर सदस्य उपस्थित होते.


0 टिप्पण्या