चित्रा न्युज प्रतिनिधी
अकलूज :-अकलूज येथील आनंदी लिनेस क्लब तर्फे गणपती विसर्जना वेळी निर्माल्य संकलित करून खत निर्मितीचा प्रकल्प करण्यात येणार आहे.माळशिरस तालुक्यातील विविध गावात जावून सार्वजनिक मंडळाकडून व विविध ठिकाणी जाऊन निर्माल्य गोळा केले व हे निर्माल्य शेतकऱ्यांच्या शेतात पुरून त्यापासून खत निर्मिती करणार येणार आहे असे राजश्री जगताप यांनी सांगितले.
बुद्धीदात्या गणरायाला पर्यावरण पूरक निरोप देऊ या, पर्यावरणाचे रक्षण करू या,
निर्माल्य दान करू या, निर्माल्यापासून उत्तम खत तयार होते.अशा निर्माल्याला पाण्याच्या स्त्रोतात टाकू नका.असे आवाहन करत लिनेस क्लबच्या वतीने करण्यात आले होते.त्याला उत्तम प्रतिसाद देत सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाने सहकार्य केले आहे.निर्माल्य संकलनामध्ये,राजश्री जगताप,रश्मी ढोक,विद्या गिरमे, मंजुषा झगडे, ज्योती लांडगे, अनुपमा कुलकर्णी,अवंतिका पांढरे, मालन गिरमे आदी सदस्यांनी सहभाग घेतला होता.
0 टिप्पण्या