चित्रा न्युज प्रतिनिधी
हंडरगुळी :-येथील बाजारात ताजा,टवटवीत भाजीपाला मिळतो.म्हणुन हाळी व परिसरातील ५० एक गावची जनता तब्बल ८ दिवसांचा भाजीपाला खरेदी करण्यासाठी हंडरगुळी येथील बाजारात गर्दी करतात.पण सप्टेंबर मध्ये झालेल्या अतिपावसाने भाज्यां पाला झाल्याने भावात वाढ झाली असून चवळी,मटकी १२० रुपये तर शेवगा १६० रुपये किलो असा भाव असल्याने स्वत: विक्री करणा-या शेतक-यांना थोडाफार दिलासा मिळू लागला आहे.
याची थोडक्यात माहिती अशी की, परिसरातील निवडक शेतकरी भाजी पाल्याची शेती करतात.त्या शेतकरी बांधवांच्या भाजीचा यंदा मुसळधार पावसाने पाला-पाचोळा केला आहे. म्हणुन उत्पादनात मोठी घट झाली.व याचा परिणाम दर वाढीवर झाला.तर हंडरगुळीच्या बाजारात जे शेतकरी स्वत:च भाजी विकतात त्यांनाच या दरवाढीचा थोडाफार दिलासा मिळत असते.बाकी बागवान मंडळी पडेल भावात भाज्या घेतात.आणि बेभावा मध्ये विकतात.
सध्या कांदे,बटाटे व टमाटे वगळता अन्य भाज्यांचे भाव वाढले आहेत. तर चवळी,मटकीच्या दराने शतक तर शेवग्याच्या दराने दिड शतक ओलांडले आहे.अन्य भाज्यांचे भाव खालील प्रमाणे आहेत.
कांदे,बटाटे,टमाटे-२०रु.कि.ग्रॅ. चवळी-मटकी १२० रु.किलो, शेवगा १६० रु.किलो,हिरवी मिरची ५० रु. कि.ढोबळी मिरची व दोडके ८० रु. कि.काकडी,भेंडी व दुधी भोपळा ६० रु.कि.लिंबू ४० कि.कोथिंबीर व मेथी ३० रु.१ पेंढी असे दर सध्या भाज्यांचे आहेत.अतिव्रष्टीमुळे दर वाढलेत.अशी माहिती हंडरगुळी येथील माजीद चौधरी या विक्रेत्याने दै. दिव्य मराठी जवळ दिली आहे.


0 टिप्पण्या