Ticker

6/recent/ticker-posts

रुई श्री बाबीर देवाची घटस्थापना मोठ्या उत्साहात संपन्न.


चित्रा न्युज प्रतिनिधी 
पुणे :-इंदापूर तालुक्यातील रुई येथील महाराष्ट्रभर प्रसिद्ध असणारे श्री बाबीर देवाची घटस्थापना आज मोठ्या उत्साहात संपन्न झाली, श्री बाबीर देवाच्या घटस्थापनेला अनेक वर्षापासून चालत आलेली परंपरा व मान असलेले थोरातवाडी येथील देवाचे मानकरी आप्पा थोरात व मधू थोरात यांच्या हस्ते देवाची घटस्थापना करण्यात आली यावेळी देवाचे भागत, देवस्थान ट्रस्ट तसेच पंचक्रोशीतील हजारो भाविक उपस्थित होते. देवाचे घट बसल्यानंतर देवाची नऊ दिवस उपासना केली जाते व नवव्या दिवशी देवाचे घट दिवाळी पाडव्याला उठवले जातात. या दिवशी सकाळी बाबीर देवाची पालखी रुई येथून पारंपारिक वाद्य फटाक्यांच्या आतिषबाजीत मंदिराकडे प्रस्थान करते. त्यानंतर मानकरी यांच्या हस्ते देवाचे घट उठवले जातात व यात्रेला सुरुवात होते, भाऊबीजेच्या दिवशी यात्रेचा मुख्य दिवस असतो या दिवशी विविध धार्मिक कार्यक्रम, देवाचा दुग्धाभिषेक, महापूजा, देवाच्या नवसाची परतफेड केली जाते, धनगरी ओव्या, गजेढोल स्पर्धा, तसेच विविध पारंपरिक, सांस्कृतिक कार्यक्रम होतात, यात्रेचा दुसरा दिवस म्हणजे पकाळणी यात्रा असते या दिवशी देवाची भाकणूक सांगितली जाते त्यानंतर नवसाचे बगाड देण्याचा धार्मिक कार्यक्रम होतो. या तीन दिवस चालणाऱ्या यात्रेसाठी संपूर्ण देश व राज्यभरातून भाविक येतात, सुमारे चार ते पाच लाख भाविक बाबीर देवाचे दर्शन घेतात. यात्रेला येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी जिल्हा, तालुका, स्थानिक प्रशासन व देवस्थान ट्रस्ट विशेष काळजी घेते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या