Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या मुख्य संयोजिकापदी चंद्रपूरातील योगशिक्षिका रंज्जू मोडक कायम!



चित्रा न्युज प्रतिनिधी 
चंद्रपूर : कला, साहित्य, क्रीडा, संगित, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील महिला व तरुणींना प्रोत्साहन देणा-या महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं व्हाॅट्सअप गृपच्या मुख्य संयोजिकापदी परत एकदा चंद्रपूर शहरातील समाजसेविका व योगशिक्षिका रंज्जू दिलीप मोडक यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका अधिवक्ता मेघा धोटे यांनी आज राजूरा मुक्कामी या प्रतिनिधीशी बोलताना दिली.
गेल्या चार वर्षांतील त्यांचे कार्य अतिशय उल्लेखनीय व कौतुकास्पद असल्याचे अधिवक्ता धोटे या वेळी म्हणाल्या! दरम्यान आपलं मायाताई कोसरे यांच्याशी बोलण झाल्यानंतर आपण मोडक यांची हि नियुक्ती केली आहे.या नियुक्तीला सहज सुचलंच्या सेवानिवृत्त नायब तहसिलदार साधना धकाते, कवयित्री शैला चिमड्यालवार, अधिवक्ता अंजली गुंडावार, संजीवनी धांडे, रजनी रणदिवे , अपर्णा चिडे,यांनी संमती दर्शवली आहे. त्यांनी देखील रंज्जू मोडक यांनी गेल्या चार वर्षांत केलेल्या कार्याचे गुणगान केले आहे  .
मोडक यांना आज पर्यंत त्यांच्या विशेष उल्लेखनीय कामगिरीसाठी अनेक कर्तृत्ववान महिला सन्मान पुरस्कार बहाल झाले आहे.नुकताच वणी येथील एका भव्य कार्यक्रमात त्यांना सन्मान पुरस्कार प्राप्त झाला असून त्यांची कन्या नूपुर मोडक ही एक उत्कृष्ट चित्रकार आहे.सध्या ती मुंबईत उच्च शिक्षण घेत आहेत.
सहज सुचलंच्या मुख्य संयोजिकापदी मोडक यांची पाचव्यांदा निवड झाल्याबद्दल भद्रावती व्हॅर्चुअस मल्टीपर्पज सोसायटीच्या संस्थापक अध्यक्ष किरण साळवी,अभियंता प्रियंका गायकवाड, राशी उराडे, आर्किटेक्ट शिवानी प्रमोद झाडे, किनवटच्या प्रख्यात रांगोळीकार साक्षी वाडगूरे, राजूराच्या प्रख्यात चित्रकार रश्मि पचारे, चंद्रपूरच्या कवयित्री प्रियंका बेन्द्रे, योगशिक्षिका माधूरी सोनटक्के,अनुश्री हिवरे ,मूलच्या समाजसेविका चंदा कामडी,नलिनी आडपवार,अभियंता पूनम कोसरे, ऐश्वर्या मांदाडे, गायत्री श्रीरामे, पूजा मंगाम, श्वेता मंडलवार, वनिता झाडे, विद्या पिंजरकर, कविता दिकोंडवार, अंजली इटनकर कवयित्री वैजयंती गहुकर, कु मंगल मिसाळ,अर्चना समर्थ, अर्चना चावरे,पूनम मडावी, रजनी पोयाम, सीमा पाटील, रश्मि हिवरे, उज्वला निमगडे, श्रध्दा परिमल, अधिवक्ता सारिका टेंभरे, जेष्ठ साहित्यिक सविता कोट्टी,समाजसेविका चैताली आतराम, जेष्ठ साहित्यिक विजया भांगे, विजया तत्वादी,उमरेडच्या सोनाली चंदनखेडे,अधिवक्ता प्रेरणा सहारे,  कवयित्री उज्वला नगराळे,पूनम मडावी,मनिषा मडावी, सुवर्णा लोखंडे, कोकिळा पोटदुखे, मीनाक्षी गुजरकर,अधिवक्ता हिमानी वाकुडकर, सुनंदा राठोड, अर्चना जाधव,ऋतूजा जाधव,निरुपा गेडाम, कविता जुमडे, रिना तेलंग , नागपूरच्या मनिषा कोडापे,पोर्णिमा किर्तीवार, दिशा ठाकरे, प्रतिभा पवार, वंदना बरडे, रोहिणी पराडकर, कल्पना मांदाडे, समता बन्सोड, फर्जना शेख, नजमा शेख, मुग्धा गायकवाड, मनिषा कोडापे आदिंनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या