Ticker

6/recent/ticker-posts

भद्रावती नगरपरिषदेला आता हवा नवीन तरुण, शिक्षित व अभ्यासु चेहरा


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती : नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक 2 डिसेंबर ला होत आहे.असल्याने  उमेदवारांची मोठी धावपळ चालू आहे. काही उमेदवारांनी ऑनलाईन फार्म भरने चालू केले आहे. काही उमेदवार शेवट येत्या 17 तारखेपर्यंत फार्म भरणार पण अजुनही काही उमेदवार पक्ष उमेदवारी देण्याच्या प्रतिक्षेत आहे. भद्रावती नगरपरिषदेची स्थापना 15 ऑगस्ट 1997 ला झाली. तेव्हा पासून  स्थापनेला 27 वर्ष पुर्ण झाले. नगर परिषदेच्या सुरुवाती पासुन तर आज पर्यंत शिवसेनेचाच गड राहिला परंतु या वेळेस शिवसेनेचे दोन गट यावेळेस आमने - सामने  लढत होणार असल्यामुळे मतांचे विभाजन होत असल्याने यावेळेस भद्रावतीकर कोणत्या शिवसेनेला पसंद करेल. कि या वेतिरिक्त दुसरा पर्याय निवडतील     हे म्हत्वाचे ठरणार आहे. पण या 
निवडणुकीच्या अध्यक्षपदा करीता व नगरसेवक पदाकरीता भद्रावतीकरांना आता नवीन  तरुण, शिक्षित, अभ्यासु, शांत, संयमी आणि दूरदृष्टी असणारा उमेदवार हवा आहे. त्याच त्या चेहऱ्यांना आता भद्रावतीकर कंटाळले आहेत.पक्ष कोणताही असो अथवा उमेदवार आजी असो या माजी असो, ज्यांना यापूर्वी संधी मिळाली आहे त्यांना संधी न देता, नविन चेहऱ्याच्या शोधात भद्रावतीकर  जनता आहे. नगरपालिकेच्या तिजोरीतील ठणठणाटास तत्कालीन नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्याधिकारीच नाही तर त्यावेळी असलेले प्रत्येक नगरसेवक देखील तितकेच जबाबदार आहेत. शहरातील भकास पडलेला विकास व भ्रष्टाचार एकट्याची जवाबदारी नसुन ते होत असताना त्या व्यवस्थेतील मुक बनुन राहणारा प्रत्येक घटक आहे. त्यामुळे जुन्याच नगराध्यक्ष, उपाध्यक्ष अथवा नगरसेवकांना परत उमेदवारीची संधी देणे म्हणजे झालेल्या चुकांची पुनरावृत्ती करण्यास वाव देण्यासारखे होईल. जे यापूर्वी पालिकेत पदाधिकारी होते, त्यांना शहराचा विकास करण्याची पाच वर्षे व त्याहून अधिक काळ संधी मिळाली होती. त्यावेळी त्यांनी त्या संधीचे सोने करायला पाहिजे होते. परंतु तसे झाले नाही. किंबहुना एकाच पक्षाला व व्यक्तींना तब्बल पंधरा वर्षे भद्रावतीकरांनी संधी दिली, तरीही शहरात म्हणावा तसा विकास करु शकले नाही. प्रचंड प्रमाणात फंड आला पण विकासकामांचा दर्जा पाहिजे तसा दिसत नाही. परिणामी आज भद्रावती शहर भकास झाले आहे. भौतिक विकास नागडा पडला आहे. पालिकेची तिजोरी रिक्त झाली आहे. शहराला शिस्त नाही. शहरात अनेक समस्या आहेत. रस्ते, सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्या, पिण्याचे पाणी, शिक्षण, आरोग्य, बगीचा, ज्येष्ठ नागरिकांना सुविधा, पर्यावरण, फुटपाथ, अतिक्रमण, पार्किंग व्यवस्था आदी बाबत अजूनही विविध समस्या आहेत. त्यामुळे आजपर्यंत जे सर्व नगरसेवक मिळून फार काही करु शकले नाही, ते आता पुढे काय करतील? हा जनतेचा सवाल आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या