Ticker

6/recent/ticker-posts

स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया ची धडाकेबाज कामगीरीमोटार सायकल चोरी करणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखा गोंदियाच्या जाळ्यात -



  
पोलीस स्टेशन रामनगर हद्दीतून मोटर सायकल चोरी करणारा आरोपीकडून चोरीची  १ मोटारसायकल एकूण किमती ५०,०००/- रुपये चा मुद्देमाल जप्त  

चित्रा न्युज प्रतिनिधी 
गोंदिया :-मा. पोलीस अधिक्षक गोंदिया श्री. गोरख भामरे सर यांचे निर्देशाप्रमाणे व पोलीस  निरीक्षक श्री पुरुषोत्तम अहेरकर , स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया येथील पोलीस पथक पोलीस स्टेशन रामनगर व गोंदिया शहर परिसरात अउघड मोटार सायकल चोरीच्या गुन्हयातील आरोपी शोध व गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना सिविल लाईन परिसरात लोकोशेडच्या जवळ एक संशयित इसम मोटर  सायकल सह मिळून आल्याने त्यास पोलीस पथकाने नाव व पत्ता विचारले असता त्याने आपले नाव गौरव उर्फ सलमान नरेश शर्मा वय २७ वर्ष राहणार यादव चौक गोंदिया असे सांगितले व तसेच त्याचे ताब्यातील मोटर सायकल बाबत सखोल विचारपूस करण्यात आली असता त्याने सदरची मोटर सायकल रामनगर परिसरातून चोरी केल्याचे कबुल केले . 
               दिलेल्या माहितीनुसार आरोपी नामे गौरव उर्फ सलमान नरेश शर्मा वय २७ वर्ष राहणार यादव चौक गोंदिया याचेकडून खालीलप्रमाणे १ मोटर सायकल हस्तगत करून जप्त करण्यात आलेले आहे.  
१) १ हिरो कंपनी ची  HF Delux मोटर सायकल काळ्या रंगाची अंदाजे किमती ५०,०००/- रुपये 

        वरील जप्त करण्यात आलेले मोटर सायकल बाबत गुन्हे अभिलेख तपासण्यात आले असता हे गोंदिया जिल्ह्याचे पोलीस स्टेशन रामनगर येथील अपराध क्रमांक १९६/२०२६ कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता मधील चोरीस गेलेले वाहन असल्याचे निष्पन्न झाले आहे. 

सदर आरोपीस मुद्देमाल सह पोलीस स्टेशन रामनगर  येथे पुढील तपास कामी स्वाधीन करण्यात आले आहे. 

         सदरची कामगीरी श्री. गोरख भामरे, पोलीस अधिक्षक, गोंदिया, स्थानिक गुन्हे शाखा गोंदियाचे पोलीस निरीक्षक श्री पुरुषोत्तम अहेरकर  यांचे मार्गदर्शनात     सहायक फौजदार राजू  मिश्रा, पोहवा  महेश मेहर,  पोहवा  प्रकाश गायधने, पो. शि. राकेश इंदूरकर,  चापोशि राम खंदारे यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या