चित्रा न्युज प्रतिनिधी
भंंडारा ;- डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलितांचे नेते नव्हते,तर ते सर्व शोषित आणि मागासवर्गीयांचे (OBC) कैवारी नेते होते.त्यांनी आपल्या राजीनाम्यातून हे सिद्ध केले की, त्यांच्यासाठी सत्ता आणि पद महत्त्वाचे नसून, उपेक्षितांना मिळणारा न्याय महत्त्वाचा आहे.
"ज्या समाजाच्या हितासाठी मी कायदामंत्री झालो होतो, त्या समाजाचे हित जर मी करू शकत नसेल, तर मला या पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही."असे ठणकावून सांगून बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील सर्व घटनकांसाठी मोलाचे कार्य केले आहे या सर्व बाबींवर ओबीसीं क्रांती मोर्चाने उजाळा देत त्रिमूर्ती चौक येथील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून जयंती साजरी केली आहे. यावेळी संजय मते ओबीसी क्रांती मोर्चा संस्थापक अध्यक्ष,अनिल कडव,यशवंत सूर्यवंशी,जीवन भजनकर,राजपूत सर,प्रकाश मुटकुरे,सुरेंद्र मोडघरे, अमित मेहर,दिलीप उमाळे,अजित शेख,सुधीर सर्वे,शोभा बावनकर, किरण मते,प्रकाश बांते,अजय तांबे, विलास साकुरे,नचिकेत मते प्रामुख्याने उपस्थित होते.


0 टिप्पण्या