Ticker

6/recent/ticker-posts

अवैध रेती वाहतूक प्रकरणात ३० लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त


चित्रा न्युज प्रतिनिधी 

भंडारा: – लाखनी तालुक्यातील मौजा खुटसावरी येथे अवैध रेती वाहतुकीविरुद्ध पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे ३०.५४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलीस ठाणे लाखनी येथे अप. क्र. 183/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 305 (ई), 49, 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी फिर्यादी म्हणून पोलीस हवालदार अमितेश सुरेशराव वडेटवार (वय 43) यांनी तक्रार दिली आहे.
दि. 14 एप्रिल 2026 रोजी मध्यरात्री सुमारे 00.10 वाजताच्या सुमारास मौजा खुटसावरी येथून सुमारे 7 किमी पश्चिमेस ही कारवाई करण्यात आली. आरोपी आशिष श्रीकृष्ण बांडेबुचे (वय 37), रतिराम बकाराम राखडे (वय 40) व संदिप मनोहर बांते (वय अंदाजे 45, तिघेही रा. भिलेवाडा, ता. जि. भंडारा) यांनी संगनमत करून शासकीय रेतीची चोरी करून ती विनापरवाना वाहतूक केल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी घटनास्थळावरून TATA कंपनीचा राखाडी रंगाचा बाराचाकी टिप्पर (क्र. MH49-BZ-5375) जप्त केला असून त्याची किंमत सुमारे 30,00,000 रुपये आहे. तसेच टिप्परमध्ये अंदाजे 9 ब्रास रेती (किंमत 54,000 रुपये) असा एकूण 30,54,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या प्रकरणी दाखल असून पुढील तपास पोलीस हवालदार गभणे करीत आहेत.
पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या