ॲड. भूपेंद्र रायपूरे, मिलिंद शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडी; 9 पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी
चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती:-बहुजन समाज पार्टी भद्रावती शहर कार्यकारिणीची आज, 16 मे 2026 रोजी पुनर्रचना करण्यात आली. अजय ग्राफिक्सजवळील बसपा कार्यालयात झालेल्या बैठकीत नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.
ॲड. भूपेंद्र रायपूरे, विधानसभा प्रभारी मिलिंद शेंडे, विधानसभा प्रभारी विकास दुर्योधन, विधानसभा अध्यक्ष हरिऔंध भारती, बसपा नेते अजय लिहीतकर तसेच नगरसेवक तथा बांधकाम सभापती व शहर अध्यक्ष मंगेश सोनुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर कार्यकारिणी गठित करण्यात आली.
नवीन कार्यकारिणी या प्रमाणे अजिंक्य बुरनुले - शहर उपाध्यक्ष भद्रावती, सचिन चालखुरे - शहर उपाध्यक्ष, शब्बू ताई रामटेके - शहर महासचिव, अमूर्त भालेराव - शहर सचिव, कुलदीप लोणारे - शहर सचिव, संतोष सिडामे - शहर सचिव, प्रतिमा खोब्रागडे - शहर सचिव, राजेंद्र पाटील - शहर प्रभारी,नरेंद्र रंगारी - शहर प्रभारी भद्रावती
यावेळी संदीप वालदे, माणिक भालेराव, प्रीता रायपूरे, अशोक जवादे, अवध प्रसाद, सुधीर भारती, रामटेके सर, रवींद्र वानखेडे, मुनेश्वर गौरकार, विशाल कांबळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
---------------------------------
बसपा भद्रावती शहरात ॲक्शन मोडमध्ये! नवीन शहर कार्यकारिणी जाहीर. अजिंक्य बुरनुले, सचिन चालखुरे उपाध्यक्षपदी. शब्बू ताई रामटेके महासचिव. ॲड. भूपेंद्र रायपूरे, मिलिंद शेंडे यांच्या उपस्थितीत निवडी. 9 पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी.


0 टिप्पण्या